शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

उंदीर पकडण्यासाठी आली पुण्याची चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 9:02 PM

स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.

ठळक मुद्दे‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे दिले प्रशिक्षण : स्क्रब टायफसच्या रुग्णांनी गाठली शंभरी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.उंदरांच्या त्वचेला घट्ट चिकटून असणारा स्क्रब टायफसचा जीवाणू ‘चिगर माईट्स’मुळे हा रोग होत असल्याचे समोर आले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा जीवाणू शोधून त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ‘चिगर माईट्स’ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आरोग्य विभागासोबतच नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला यश आले नाही. याची दखल घेत पुण्याच्या सहसंचालक आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ चमूला पाचारण करण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून ते नागपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांनी नरखेड, काटोल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.‘लोकमत’शी बोलताना कीटकशास्त्रज्ञ मुकुंद देशपांडे म्हणाले, घराघरात आढळून येणारा उंदीर आणि शेतात, जंगलात आढळून येणाºया उंदरांमध्ये फरक असतो. स्क्रब टायफस हा आजार शेतात आढळून येणाºया ‘टटेरा इंडिका’ या भुºया रंगाच्या उंदराच्या शरीरावर पोसल्या जाणाºया ‘चिगर माईट्स’मुळे होत असावा, अशी शक्यता आहे. यामुळे या रोगाचे ‘पॉझिटीव्ह’ आलेल्या रुग्णांचा इतिहास घेऊन शेत जमीन व गवताळ भागातील उंदराच्या बिळाच्या तोंडावर, आडोशाला व इतरही ठिकाणी ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण कर्मचाºयांना दिले. पकडण्यात येणारे हे उंदीर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तिथे त्यांच्या अंगावर चिकटून असलेले ‘चिगर माईट्स’ काढून त्यावर अभ्यास केला जाईल. उंदरामुळे ‘स्क्रब टायफस’ पसरतो हे म्हणणे योग्य असले तरी उंदीर मारणे हा त्यावर उपाय नाही. उंदीर मारणे सुरू झाले तर त्याच्या रक्तावर पोसणारा हा जीवाणू लोकांमध्ये वेगाने पसरून, धोका वाढू शकतो.

टॅग्स :nagpurनागपूरPuneपुणे