लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’ विस्कटलेली. यामुळे पक्षातील कार्यकर्ते निराश झाले. नेते विदर्भातील कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही, अशा समजातून अनेकांनी पक्ष सोडण्याचा विचार बोलून दाखविला. ही संभाव्य पडझड थांबवून विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे हे १३ आॅक्टोबरपासून विदर्भाच्या दौºयावर येत आहेत.१३ आॅक्टोबर रोजी नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीणचा आढावा घेतला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी अंतर्गत गटबाजीच्या तक्रारींमुळे त्रस्त झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दोन माजी मंत्र्यांकडे शहर व जिल्ह्याची जबाबदारी सोपविली होती. अनिल देशमुख यांच्याकडे शहर तर रमेश बंग यांच्याकडे नागपूर ग्रामीणची जबाबदारी सोपविली होती. दोन मंत्र्यांकडे धुरा सोपविल्यानंतरही फारसा फरक पडला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले. दुनेश्वर पेठे हे एकमेव नगरसेवक निवडून आले तर ग्रामीणमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीतही ‘टिकटिक’बंद झाली. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांकडून पक्षबांधणी व विस्ताराचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतर वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये पवार, तटकरे हे दोन्ही नेते जाणार असून तेथील वास्तविकता जाणून घेणार आहे.नेत्यांच्या या बैठकीच्या तयारीसाठी नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक पक्ष कार्यालयात माजी मंत्री अनिल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झाली. तीत कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, नगरसेवक दुनेश्वर पेठे, कामगार नेते बजरंगसिंग परिहार, प्रवक्ता राजू नागुलवार, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, रूपेश पन्नासे, विद्यार्थी अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, शहर महिलाध्यक्षा अलका कांबळे, माजी महिला अध्यक्षा नूतन रेवतकर आदी उपस्थित होते.बैठकीत देशमुख यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे निर्देश दिले. तसेच पवार, तटकरे यांच्या बैठकीची तयारी करण्याची जबाबदारी प्रवीण कुंटे यांच्यावर सोपविण्यात आली.राणेंसोबत जाण्याची भीतीमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस सुरू झाली. महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटप, पराभव यामुळे नाराज असलेले काही कार्यकर्ते पर्यायाच्या शोधात आहेत. त्यांनी संधी साधत राणेंसोबत जाण्याची तयारी चालविली आहे. अशा पदाधिकाºयांना समजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पवार व तटकरे या दौºयाच्या माध्यमातून नाराजांची समजूत काढून आम्ही खंबीरपणे तुमच्यासोबत असल्याचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
विस्कटलेली ‘घडी’ बांधण्यासाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:37 AM
विधानसभा, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’ विस्कटलेली. यामुळे पक्षातील कार्यकर्ते निराश झाले.
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे मिशन विदर्भ : अजित पवार, तटकरे विदर्भ दौºयावर