शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘धावणार माझी मेट्रो’ विशवॉल मोहिमेला प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:00 PM

महामेट्रो नागपूरतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो, विश वॉल’ मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भक्ती’ या निवासस्थाहून नागपूर मेट्रोला ‘विश वॉल’वर लिहून शुभेच्छा दिल्या. नागपूर मेट्रो नागरिकांना नववर्षात नवीन भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे नितीन गडकरीसह आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूरतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो, विश वॉल’ मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भक्ती’ या निवासस्थाहून नागपूर मेट्रोला ‘विश वॉल’वर लिहून शुभेच्छा दिल्या. नागपूर मेट्रो नागरिकांना नववर्षात नवीन भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.गडकरी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांना नववर्षात विकास कामांसाठी सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आयएएस, आयपीएस, डीसीपी अधिकाºयांनीदेखील या मोहिमेचे कौतुक केले आहे. अलीकडेच आयोजित जॉय राईडमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी ‘विश वॉल’वर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.नागपूर मेट्रोत प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शुभेच्छा देऊ लागले आहेत. नागरिकांच्या शुभेच्छांच्या आठवणी जपण्यासाठी महामेट्रो नागपूरतर्फे ‘धावणार माझी मेट्रो’, ‘विश वॉल’ची संकल्पना राबविली आहे. ‘धावणार माझी मेट्रो’ या नावाने हॅशटॅग नागपूरकरांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवरही नागरिक उत्स्फूर्त शुभेच्छा देत आहेत. नागरिकांचा उत्साह बघता या शुभेच्छा संकलित करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे. शिवाय नागपूर मेट्रोच्या लिंकवर ‘धावणार माझी मेट्रोला’ शुभेच्छा देता येतात.झिरो माईल्स येथील माहिती केंद्र, लिटिल वूड, मेट्रो हाऊस यासह विविध ठिकाणी महामेट्रोतर्फे ‘विश वॉल’ लावण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शहरात येणारे कलाकार माहिती केंद्रात येऊन शुभेच्छा ‘विश वॉल’च्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाला देत आहेत. या मोहिमेत भाषेचे बंधन नाही. नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभाग नोंदवित आहेत. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. अनेकांनी आपल्या परिसरात ‘विश वॉल’ लावा अशी इच्छा नागरिक महामेट्रोकडे व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था अशा विविध ठिकाणी ‘विश वॉल’ लावण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.