शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

त्रस्त नवरोबाचा नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 9:54 PM

कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देन्यायासनावर खुर्ची फेकली : जोरजोराने ओरडून शांतता भंग केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कृष्णा सुंदरलाल श्रीवास (३५) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, तो गणेशपेठ येथील रहिवासी आहे. त्याने २०१५ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून, ती याचिका प्रलंबित आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायाधीश पलक जमादार यांच्यासमक्ष सुनावणी होती. त्यासाठी तो न्यायालयात आला होता. कुटुंब न्यायालय वकील संघटनेचे उपाध्यक्ष व प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. श्याम अंभोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १.३० च्या सुमारास श्रीवास आरडाओरड करीत न्यायालयात आला.प्रवेशद्वारावरील पोलिसांना हुलकावणी देऊन तो थेट पहिल्या माळ्यावर चढला. दरम्यान, त्याने पक्षकारांना न्यायालय प्रकरणांची माहिती देणाऱ्या संगणकावर हेल्मेट आदळले. तेथून पुढे येऊन त्याने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या कार्यालयाची फायबरची खुर्ची पहिल्या माळ्यावरून खाली फेकली. त्यामुळे खुर्ची तुटून निकामी झाली व खाली उभ्या वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तो ओरडत न्या. जमादार यांच्या न्यायालयात गेला. त्याने तेथील फायबरची खुर्ची उचलून ताकदीने न्यायासनावर फेकली. त्यामुळे न्यायाधीशांची वजनी लाकडी खुर्चीही मागे पलटली व आसनावरील काच फुटला. ती मधल्या सुटीची वेळ असल्यामुळे न्या. जमादार चेंबरमध्ये बसून होत्या. परिणामी, मोठा अनर्थ टळला.श्रीवासला ताब्यात घेण्यात न्यायालयातील पोलिसांनी विलंब केला. त्यामुळे त्याने एवढ्या गंभीर स्वरूपाचा हैदोस घातला. न्यायासनावर खुर्ची फेकेपर्यंत कुणीही धावून त्याला पकडले नाही. त्याने हा हैदोस घालण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. श्रीवासला न्या. जमादार यांच्या न्यायालयात पकडून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.कडक सुरक्षा नाहीबार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदीपे यांनी कुटुंब न्यायालयात कडक सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहिती दिली. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे न्यायालयात कधीही गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारची घटना त्याचाच पुरावा असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय