शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

नागपूरच्या ग्रामीण भागातल्या खात येथील आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:35 AM

मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कमतरतापाच उपकेंद्रातील विविध गावांचा समावेश

मंगेश तलमले ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण पाच उपकेंद्रांचा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील प्रत्येक गरीब व्यक्तीना वैद्यकीय सेवेसाठी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून राहावे लागते. सध्या या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते.डॉ. हर्षवर्धन मानेकर यांची या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळात चांगली वैद्यकीय सेवा मिळत असल्याची माहिती अनेक रुग्णांनी दिली. दोन वर्षांपूर्वी त्यांची काटोल येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून आजवर या आरोग्य केंद्रात एकही अनुभवी डॉक्टर नियुक्त करण्यात आला नाही. रात्रीला डॉक्टर हजर राहात नसल्याने नर्स रुग्णांवर औषधोपचार करते. त्यामुळे बहुतांश रुग्णांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवावे लागते. हा प्रकार आता सामान्य झाला आहे.विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील बहुतांश गावे खात प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अपघातातील जखमींना प्रथमोपचारासाठी खात आरोग्य केंद्रातच आणले जाते. डॉक्टरअभावी जखमींचीही गैरसोय होते. या भागातील महिलांची प्रसूती याच आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात केली जातो. याच प्रकाराचा फटका गरोदर मातांनाही सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेची जबाबदारी एकमेव कर्मचाऱ्यावर सोपविली आहे. तोही वेळेवर आरोग्य केंद्रात पोहोचत नाही. सदर आरोग्य केंद्राची आठवड्यातून एक ते दोनदा झाडझुड केली जात असून, परिसराच्या साफसफाईला कुणीही हात लावत नाही. त्यामुळे परिसरात कचरा पडल्याचे दिसून येते. येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोळ्यांचे डॉक्टर यायचे. तेही आता बंद झाले आहे. मात्र, डोळ्यांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा ओघ थांबला नाही. येथे पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. हा गंभीर प्रकार लोकप्रतिनिधींना माहिती असून, याचे कुणालाही सोयरसुतक नाही.

जैविक कचरा अस्ताव्यस्तरुग्णालयातील औषधे व इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या, निडल्स यासह अन्य जैविक कचऱ्याची नियमाप्रमाणे योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. या आरोग्य केंद्रालगत असलेल्या एका नालीत हा जैविक कचरा टाकून जाळण्यात आला. मात्र, तो अर्धवट जळाला. हा कचरा खोल खड्ड्यात पुरणे आवश्यक असताना त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. परिणामी, हा घातक कचरा अस्तावस्त पसरत असून, त्यात इंजेक्शनच्या निडल्सदेखील आहेत. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाला जाग केव्हा येणार, हे कळायला मार्ग नाही.

रुग्णवाहिका आजारीया आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका दिली आहे. ती १५ वर्षे जुनी असल्याने तसेच तिची योग्य देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याने ती बिघडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या आजारी असलेल्या रुग्णवाहिकेमुळे अपघातातील जखमींना किंवा प्रसूती रुग्णांना मौदा, नागपूर किंवा भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक वेळी रुग्णाला खासगी वाहनाने न्यावे लागते. त्या वाहनात मूलभूत सुविधा नसतात. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी या रुग्णवाहिकेचाच अपघात झाला होता. येथे पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची तसदीही प्रशासन घेत नाही.

टॅग्स :Healthआरोग्य