आॅनलाईन लोकमतनागपूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ग्रामीण भागातही सेवा मिळावी यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बँक’ ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. यात जे डॉक्टर विविध शिबिरांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागात आपली सेवा देतील त्यांना ‘क्रेडिट पॉर्इंट’ देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया गृह (ओटी) क्रमांक ‘एफ’च्या नुतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये उपस्थित होते.गिरीश महाजन म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णांना अद्ययावत सोयी पुरविण्याच्या दृष्टीने सरकार कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर मेडिकलला अद्ययावत शस्त्रक्रिया गृह यंत्रसामुग्री व तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात केवळ नागपूरच्या मेडिकलमध्ये डॉ. राज गजभिये यांच्या प्रयत्नांमुळे लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया ‘बेरियाट्रीक सर्जरी’ सुरू झाली आहे. याचा फायदा अनेक रुग्णांना होत आहे, असेही ते म्हणाले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरपासून ते रुग्णांच्या सोयींसाठी इतरही विभाग सुरू करण्यात आले आहे. याच्या जोडीला अद्ययावत यंत्रणा उभी केल्याने रुग्णांचा कल मेडिकलकडे वाढत आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांची जबाबदारी वाढली आहे. यावेळी संजय देशमुख यांनी, अद्ययावत विभाग व तज्ज्ञाचा वापर तळागळातील रुग्णापर्यंत पोहचवा, रुग्णांची संख्या वाढवा, अशा सूचना केल्या. प्रास्ताविक डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी केले. आभार डॉ. राज गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
‘ग्रामीण आरोग्य बँक’योजना लागू करणार ; वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:53 PM
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ग्रामीण भागातही सेवा मिळावी यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बँक’ ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. यात जे डॉक्टर विविध शिबिरांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागात आपली सेवा देतील त्यांना ‘क्रेडिट पॉर्इंट’ देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
ठळक मुद्देमेडिकलच्या ‘ओटी एफ’च्या नुतनीकरणाचे उद्घाटन