लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी रशियाचे एन्तोनोव्ह-१२४ कार्गो विमान पोहोचले. हे विमान सुरक्षा सामुग्री घेऊन आले आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला.हे कार्गो विमान नागपूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या कुलिंग हॉटपिटलगतच्या जागेवर ठेवण्यात आले आहे. रशियन विमानाची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पाहण्यासाठी विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान सोमवारी नागपुरात येणार होते. पण काही कारणांमुळे मंगळवारी सकाळी पोहोचले. विमान मंगळवारी रवाना होणार होते. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही. एन्तोनोव्ह-१२४ विमानांचा उपयोग जड वस्तूंची ने-आण करण्यासाठी केला जातो. या विमानात संपूर्ण बोईंग-१८० विमान नेता येते. यामध्ये काही लोडेड ट्रक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येतात. लक्झरियस कार एका देशातून दुसऱ्या देशात नेण्यासाठी या विमानाचा उपयोग करण्यात येतो.