शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एस. पी. यादव नवीन आयुक्त

By admin | Published: April 14, 2015 2:20 AM

अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि सीआयडीचे प्रमुख एस. पी. यादव यांची नागपुरच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

पाठक पुण्याचे आयुक्त : अनुपकुमार मुंबईला सहआयुक्त नागपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि सीआयडीचे प्रमुख एस. पी. यादव यांची नागपुरच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लोकमतने रविवारच्या अंकात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून एस. पी. यादव होणार असल्याच्या आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. १९७३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले यादव हे विधी शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गोंदियात सेवा दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. येथील पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार, अशी महिनाभरापासूनच चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या गुड बुकमध्ये असल्यामुळे पाठक यांना नवी मुंबई, पुणे किंवा ठाण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. लोकमतने तसे वृत्तही प्रकाशित केले होते. ते अखेर खरे ठरले. मुंबई आयुक्तानंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद मानल्या जाणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त पदावर पाठक यांना नियुक्त करण्यात आले. तर रश्मी शुक्ला, बिपीन बिहारी, कनकरत्नम, विवेक फणसाळकर तसेच डॉ. भूषणकुमार उपाध्याय ही नावे बाजूला सारत नागपूरचे आयुक्त म्हणून एस. पी. यादव यांची नियुक्ती झाली. आयुक्तांसोबतच सहआयुक्त अनुपकुमार सिंह यांची मुंबईला सहआयुक्त (आर्थिक शाखा) म्हणून बदली करण्यात आली. सर्वाधिक कार्यकाळ आणि विविध पदे सांभाळणारे अधिकारी म्हणून अनुपकुमार यांचे नाव घेतले जाते. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहपोलीस आयुक्तांसोबतच एएनओचे विशेष महानिरीक्षक म्हणून अनुपकुमार यांनी नागपुरात तब्बल सात वर्षे सेवा दिली आहे. सहआयुक्त म्हणून राजवर्धन जबाबदारी सांभाळणार आहेत.