शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 8:33 PM

नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल.

ठळक मुद्देराष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय देशाला समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. ही आशिया खंडातील एकमेव अशी अकादमी आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे ती सार्क देशांसाठीही फायद्याची ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे व्यक्त केला. 

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील नवनिर्मित परिसर गुरुवारी राष्ट्राला समर्पित व एनडीआरएफ अकादमीची स्थापना करताना ते बोलत होते. यावेळी अग्निशमन शौर्य पदकांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, तसेच गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या अग्निशमन सेवा व व नागरिक सुरक्षा विभागाचे महानिदेशक एम. नागेश्वर राव, एस.एस. प्रधान, संजीवकुमार जिंदल प्रामुख्याने उपस्थित होते. 
अमित शाह म्हणाले, सध्या अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण झाली आहे. अलीकडे देशात तीन मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. यात लोकांचे जीव आणि संपत्तीच्या संरक्षणात एनडीआरएफने महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये १० हजारावर लोकांचे बळी जात होते. परंतु आता तसे राहिले नाही. अत्याधुनिक प्रशिक्षणयुक्त देशातील एनडीआरएफ अतिशय मजबुतीने आपत्ती निवारणाचे कार्य करीत आहे. कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास एनडीआरएफ तात्काळ पोहोचते. हे काम केवळ चार वर्षात झाले हे विशेष. आपत्ती निवारण आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग गेली ७० वर्षे दुर्लक्षित राहिले. अग्निशमन हा राज्यांचा विषय आहे. राज्यांनीही तो महापालिकेच्या भरवशावर ठेवला. त्यामुळे हे विभाग कायमस्वरुपी दुर्लक्षित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये या दोन्ही विभागाला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. केवळ चार वर्षात एनडीआरएफ देशभरात पसरले. आज प्रत्येक राज्यात एक नैसर्गिक आपत्ती निवारण फोर्स तयार आहे. जिल्हा स्तरावरही ही चमू तयार होत आहे. अतिशय चांगले काम करीत असलेल्या एनडीआरएफमध्ये आणखी चार बटालियनचा समावेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,आंतरिक व बाह्य सुरक्षेसोबतच जानमालाची सुरक्षाही महत्त्वाची आहे. हेच कार्य अग्निशमन विभाग व एनडीआरएफ करते.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, देवेंद्र फडणवीस, एस.एन. प्रधान यांनीही आपले विचार व्यक्त केले. एम.नागेश्वर राव यांनी प्रास्ताविक केले. तर जी.एस. सैनी यांनी आभार मानले.भूमिपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतोराष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे काम अनेक वर्षे रेंगाळले. याचा हा धागा पकडत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, कॉग्रेसच्या काळात एखाद्या प्रकल्पाचे किंवा संस्थेचे कार्य वर्षानुवर्षे चालायचे. भूमिपूजन एक सरकार करायचे. निधी दुसरे सरकार द्यायची, काम तिसऱ्या सरकारमध्ये सुरू व्हायचे आणि उद्घाटन चौथ्या सरकारमध्ये व्हायचे. अशी पद्धत होती. परंतु मोदी यांच्या सरकारमध्ये भूमिपूजनही आमचेच सरकार करत आणि उद्घाटनही आमचेच सरकार करते, असा चिमटा त्यांनी काढला.मोठ्या कंपन्यांमधील अग्निशमन उपकरणांचाही उपयोग होणारअनेक मोठ्या कंपन्यांकडे अग्निशमनाशी संबंधित अत्याधुनिक उपकरण असतात. अशा उपकरणाची व सुविधांची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मल्टिपर्पज उपयोगाच्या रणनीतीअंतर्गत हे करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास जिल्हधिकाऱ्यांना या उपकरणाचा उपयोग करता येईल. यासाठी अत्याधनिक उपकरण मागवण्याची गरज भासणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्षअमित शाह यांनी सांगितले की, २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होती. तेव्हा आम्ही जगात ११ व्या क्रमांकावर होतो. पाच वर्षात आम्ही ती २ ट्रिलियनपर्यंत पोहोचवली. म्हणजेच ७० वर्षात एक ट्रिलियन आणि पाच वर्षात एक ट्रिलीयन अशा पद्धतीने आम्ही काम केले. पुढील पाच वर्षात ५ ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था नेऊन जगात ती १ ते ३ क्रमांकापर्यंत पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

 राष्ट्रपती अग्निशमन शौर्य पदकांचे वितरण यावेळी अग्निशमन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. अब्दुल माजिद वाणी, रवींद्र कुमार, राज कुमार, मनोहर लाल, पूरण सिंह, राजन, मनप्रीत सिंह, सुखदेव सिंह यांना मरणोपरांत पुरस्कार मिळाला. त्यांच्या नातेवाईकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच हजुरा सिंह, नरेश कुमार, लवलेश सूद, सुदागर सिंह, गुलाम हसन वाणी, बशीर अहमद खान, गुलाम हसन भट्ट, गुलाम हसन लोन, परवेज अहमद वानी, अमन शर्मा, अजित सिंह, जितेंद्र कुमार, धर्मेंद्र मिश्रा, लोटन राम, सूर्यप्रताप सिंह, राकेश तिवारी, प्रमोद भोंडे, इंद्रजीत सिंह चड्ढा व उमापती दंडापती यांनाही शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलAmit Shahअमित शहा