शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सचिन कुर्वे यांनी केले नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:23 AM

जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घेतली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कारही मिळाला.

ठळक मुद्देतीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घेतली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कारही मिळाला.शासन आपल्या दारी या धर्तीवर त्यांनी प्रशासन आपल्या दारी योजना राबविली. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर शिबिरे आयोजित केली. आॅनलाईन सातबारा सुरू केला. ‘एटीएम’च्या धर्तीवर सातबाराही उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी वेंडिंग एटीएम मशीन जिल्ह्यात सुरू केल्या. शेतकºयांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला. वाळूचोरी रोखण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करणारे नागपूर हा पहिला जिल्हा ठरला. त्यामुळे वाळूचोरीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. जलयुक्त शिवार ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. यासाठीही त्यांनी ड्रोनचा वापर खुबीने करून घेतला.शासकीय प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हे नेहमीच गुंतागुंतीचे काम राहिले आहे. तातडीने जागा मिळत नसल्याने अनेक प्रकल्प रखडल्याचा इतिहास आहे. परंतु नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू झाला आणि त्यासाठी लागणारी आवश्यक जागा लगेच उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे मेट्रो प्रकल्प गतीने सुरू आहे. यात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वसामान्यांना ‘अपॉर्इंटमेंट न घेताही थेट भेटता यावे म्हणून कुर्वे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी होताच सकाळी १० ते २ ही वेळ अशा लोकांसाठीच राखून ठेवली होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दलालांचा बंदोबस्त करण्यासाठीही त्यांना नेहमीच आठवणीत ठेवले जाईल. नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान व पारदर्शी करणारे कुर्वे हे नेहमीच नागपूरकरांच्या स्मरणात राहतील.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर