शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर

By कमलेश वानखेडे | Published: November 13, 2024 5:56 PM

Nagpur : भाजपच्या डबल इंजिनमधून धूर निघतोय

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मतदारांना ‘बटेंगे तो कटेंगे’ असे सांगत आहेत. त्यांची ही घोषणा अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवणारी व भीती दाखविणारी आहे. सगळ्यांना घेऊन चालण्या ऐवजी ते अशी भाषा बोलतात हे योग्य नाही. अयोध्येत त्यांची लोकसभेची जागा हरली त्याला काय म्हणायचे, असा सवाल करीत ‘पढेंगे तो बढेंगे’ हे काँग्रेसचे धोरण असून ते आम्ही आधीपासूनच राबवित आहोत, असे उत्तर काँग्रेस नेते व राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री खा. सचिन पायलट यांनी दिले.

विदर्भातील निवडणूक प्रचारासाठी खा. सचिन पायलट हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रचारची गती जसजशी वाढत आहे त्याप्रमाणे भाजपचे बोल बिघडत आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितले की आम्ही पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन चालत आहोत. भाजप डबल इंजिन सरकार सांगते मात्र त्या इंजिन मधून धूर निघत आहे. डबल इंजिन सरकार असताना त्यांना निवडणुकीच्या आधी योजनांची घोषणा का करावी लागत आहे, असा सवाल त्यांनी केला. यांनी योजना आणली तर हे दाता आणि विरोधी पक्षाने आणली तर तिला रेवडी वाटणे म्हणणे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. आम्ही विकासाबद्दल बोलतो. कुणावर चिखलफेक करीत नाही. महाराष्ट्रात आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा त्यांनी केला. डाटा गोळा करण्यासाठी जनगनना आवश्यक आहे. त्यातून कोणाचा किती भाग आहे ते समजते. त्यानुसार त्याचे विभाजन करता येऊ शकते. गरजवंत लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते. 

तर भाजपने संविधानाशी छेडछाड केली असतीभाजपने लोकसबा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला होता. मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली. त्यांना ४०० जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी संविधानाशी छेडछाड केली असती, असा दावा सचिन पायलट यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sachin Pilotसचिन पायलटnagpurनागपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस