शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नागपुरातील गरिबाच्या झोपडीत सचिनचा दुर्मिळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 9:33 PM

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोपडीत तो या सर्व वस्तू जपतोय.

ठळक मुद्देसचिनवेडा रूपकिशोर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोपडीत तो या सर्व वस्तू जपतोय.५० च्यावर वय असलेला रूपकिशोर कनोजिया मातृसेवा संघात काम करायचा. खेळाडू आणि संग्राहकवृत्ती असल्याने आणि त्यातच क्रिकेटचे प्रचंड वेड असल्याने क्रिकेटच्या संदर्भातील अनेक वस्तू त्याच्याकडे आहेत. सचिन हा त्याचा सर्वात आवडता खेळाडू. सचिनच्या पहिल्या टेस्टपासून त्याच्या निवृत्तीच्या सामन्यापर्यंत सर्व सामने रूपकिशोरने बघितले आहे. सचिनची खेळी बघण्यासाठी तो नोकरीचीही पर्वा करीत नव्हता. सचिनची आॅटोबायोग्राफी त्याला मुखद्गत आहे. सचिनने २०० टेस्ट मॅचमध्ये १५हजार ९२१ धावा काढल्या, ५१ शतक ठोकले. ४६३ एकदिवसीय सामने त्याने खेळले १८ हजार ४२६ धावा त्याने केल्या, ४९ शतक त्याने ठोकले. दोन्ही क्रिकेटमध्ये त्याने ३४ हजार ३५७ धावा त्याने ठोकल्या. सचिनची क्रिकेटमधील कारकीर्द अशी पटापट रूपकिशोर सांगतो.त्याचे खरे कौतुक त्याच्याकडे असलेल्या संग्रहाचे आहे. त्याच्या संग्रहात स्वित्झर्लंडने २०१३ मध्ये सचिन चित्रित असलेले ६,००० रुपये भारतीय किमतीचे चांदीचे नाणे, बूस्ट कंपनीने सचिनवर काढलेले ‘मॅच टॉस कॉईन’ रूपकिशोरच्या संग्रहात बघायला मिळतात. पोस्टल डिपार्टमेंटने सचिनच्या प्रत्येक टेस्ट सामन्यावर फर्स्ट डे कव्हर, पोस्ट तिकीट, माहितीपत्रक, मिनीचर, शीटलेट काढले होते. त्याच्याकडे दोनशेही टेस्ट मॅचचे हे सर्व साहित्य आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा महाराष्ट्र शासनाने ११ आणि ४ लाखाची सागरलक्ष्मी लॉटरी काढली होती. त्यात सचिनचा फोटो होता. ही लॉटरी त्याच्याकडे बघायला मिळते. सचिनच्या २४ एप्रिल १९७३ या जन्मतारखेची नोट आहे. सचिनने केलेले १०० शतक व त्याने क्रिकेटमधून घेतलेला संन्यास या दोन्ही वेळी देशभरातील वृत्तपत्राने विशेष अंक प्रकाशित केला होता. ही सर्व वृत्तपत्रे त्याच्याकडे आहेत. त्याचबरोबर देशातील नामांकित मॅगझिनने सचिनवर काढलेले विशेष अंक त्याच्याकडे आहेत. हा संग्रह इतका आहे की घरात ठेवायला जागा नाही, परंतु त्याने तो सांभाळला आहे.असा जुळविला संग्रहजुन्या बाजारात रूपकिशोरला सचिनची आॅटोबायोग्राफी मिळाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लॉटरीचे तिकीट मिळाले. मित्रांच्या सहकार्याने वृत्तपत्र त्याने गोळा केले. क्रिकेटच्या मॅगझिन जुन्या पुस्तक बाजारात मिळाल्या. खिशातून पैसे खर्च करून क्वॉईन गोळा केले. सचिन स्वप्नात येतोशेन वॉर्न जसा सचिनच्या स्वप्नात यायचा. सचिनचे तसे स्वप्न रूपकिशोरलाही पडतात. सचिनच्या या दर्दीला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. आपल्या संग्रहावर त्याचा आॅटोग्राफ हवा, असे त्याचे स्वप्न आहे.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरnagpurनागपूर