वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)
१) २०१७-१८- १,५१,१४२
२) २०१८-१९- १,३३,३९५
३) २०१९-२०- १,३४,१४७
४) २०२०-२१- १,०२,३८९
५) २०२१-२२- ९२,७७०
...
मी मागील ३० वर्षापासून साेयाबीनचे पीक घेत आहे. अलीकडे साेयाबीनचे तीन पैकी काेणतेही वाण वापरले तरी कीड, राेग व पावसामुळे पिकाचे नुकसान सहन करावे लागत आहे. पूर्वीपेक्षा उत्पादनखर्च वाढला असून, भाव मात्र मिळत नाही. तीन ते साडेतीन महिन्यात येणारे दुसरे नगदी पीकही नाही.
- रामभाऊ सेंबेकर, शेतकरी.
...
साेयाबीनचे पीक दिवाळी आधी येते. मागील काही वर्षापासून उत्पादनात सारखी घट येत आहे. राेग व किडींमुळे दाणे परिपक्व हाेत नाही. राेग व किडींच्या व्यवस्थापनासाठी माेठा खर्च करावा लागत असल्याने उत्पादनखर्च वाढला आहे. खर्च भरून निघेल एवढाही भाव साेयाबीनला मिळत नसल्याने ते परवडत नाही.
- संजय वानखडे, शेतकरी.
...
बहुतांश शेतकरी रबी पिकांची पेरणी करीत असल्याने ते अर्ली व मीडियम व्हेरायटी वापरतात. या दाेन्ही व्हेरायटींमध्ये त्यांना रबी पिकासाठी शेत तयार करायला बराच अवधी मिळताे. मात्र, या दाेन्ही व्हेरायटीच्या साेयाबीन पिकाचे कीड व राेगामुळे नुकसान हाेते. तुलनेत लेट व्हेरायटीच्या साेयाबीनचे नुकसान कमी असले तरी हे वाण परतीच्या पावसात सापडत असल्याने दाणे झाडाला काळवंडणे, अंकुर फुटणे, साेयाबीन खराब हाेणे असे प्रकार घडतात. रबी पिकासाठी शेत तयार करायला अडचणी येतात.
- डाॅ. याेगीराज जुमडे, उपविभागीय कृषी अधिकारी.