नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातच नव्हे तर मध्य भारतात रेल्वेचा एक महत्वाचा लोको शेड मानला जाणाऱ्या अजनी ईलेक्ट्रीक लोको शेडची सुरक्षा आता 'तिसरा डोळा' करणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने खाली, वर आणि लोको शेडच्या चोहोबाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको शेडच्या प्रत्येक दुसऱ्या टेस्ट ट्रॅकवर चार हाय डेफिनेशन कॅमेरे आणि ५० व्हॅटचे एलईडी लाईटस् अशा पद्धतीने लावण्यात आले आहे की या लोकोमोटीव्हचे सर्वसमावेशक व्हीडीओ कव्हरेज आता उपलब्ध होणार आहे. तळ आणि छताची संपूर्ण बाजू कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असल्याने कोणत्या वेळी कुणी कोणते काम केले, ते सहजरित्या माहिती पडणार आहे.
रुफटॉपच्या व्हिडिओग्राफीसाठी ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) जवळदेखिल एक कॅमेरा बसविण्यात आला असून टेस्टींग ट्रॅकवर आत असलेल्या फ्रेम अंतर्गत प्रत्येक उपकरणांवर कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. ट्रॅकवर दोन्ही बाजूला लावण्यात आलेले कॅमेरे कोचच्या मशिनरीज, अंडर-स्लंग कॉम्प्रेसर, बॅटरी बॉक्स आणि इतर महत्वाच्या उपकरणावर नजर ठेवणार आहे.अत्याधुनिक असे हे व्हिडिओ रेकॉर्डिंग सेटअप लोकोमोटिव्हची २४ तास देखरेख अर्थात सुरक्षा करणार आहे.
सुरक्षेसाठी प्रशासन कटीबद्धअत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धतीचा वापर करून रेल्वेशी संबंधित प्रत्येक घटकाची सुरक्षा करण्यासाठी मध्य रेल्वेचा नागपूर विभाग अटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया या संबंधाने रेल्वेच्या वरिष्ठांनी दिली आहे.