लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव तर्फे २०१८ चे साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले असून नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांच्या ‘झिरो मॅरेज' या कथासंग्रहास ‘वि. ना. मिसाळ’ पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते दि. ८ जून २०१९ रोजी बेळगाव येथे होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. विनोद गायकवाड, प्रा. शुभदा शहा, अजित आजगावकर, प्रा. शैलजा यादवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ‘मराठी वाङ्मय परिषद, बडोदाच्या अखिल भारतीय साहित्य स्पर्धेत त्यांच्या ‘आठवणीतील वैशाख’ या ललित लेखाला ललित लेखनाचा अखिल भारतीय स्तरीय तृतीय पुरस्कार पुरस्कार घोषित झाला आहे. सूर्योदय सर्वसमावेश मंडळ जळगावनेसुद्धा त्यांच्या ‘झिरो मॅरेज’ कथासंग्रहाला पुरस्कार जाहीर केला आहे.
वर्षा किडे कुळकर्णी यांना साहित्य पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:42 PM