लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. कारागृह प्रशासन त्याच्यावर योग्य औषधोपचार करीत नसल्याचा आरोप प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तसेच, पोटाच्या एका आजारावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करायची असल्याने जामीन देण्यात यावा अशी विनंती साईबाबाने न्यायालयाला केली आहे. हे प्रकरण शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले होते. दरम्यान, राज्य सरकारने साईबाबाच्या आरोपांवर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाला वेळ मागून घेतला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी १९ जुलैपर्यंत तहकूब केली.७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी धरून कमाल जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध साईबाबासह इतर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले असून ते अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल झाले आहे. साईबाबातर्फे अॅड. मिहीर देसाई तर, सरकारतर्फे अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.
साईबाबा म्हणतो नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 9:36 PM
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
ठळक मुद्देहायकोर्टात प्रतिज्ञापत्र : सरकार देणार प्रत्युत्तर