शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

सैराटच्या 'आर्ची'ने साधला रुग्णाशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:56 AM

सैराट चित्रपटात ‘आर्ची’ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी अर्धांगवायुच्या रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्देप्रमोद गिरी, चंद्रशेखर पाखमोडे यांनी दिली मेंदू उपचारावरील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सैराट चित्रपटात ‘आर्ची’ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी अर्धांगवायुच्या रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी या आजाराची लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती दिली.एका चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू नागपूरला आली होती. तिच्या चित्रपटात ‘न्यूरो सर्जरी’च्या एका प्रसंगामुळे तिने न्यूरॉन हॉस्पिटल, धंतोलीला भेट दिली. या प्रसंगी तिच्यासोबत सहकलाकार चिन्मय उद्गीरकर, दिग्दर्शक गणेश पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. मंजुषा गिरी, डॉ. मनिषा पाखमोडे, डॉ. वर्तिका पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.रिंकूने अतिदक्षता विभागात रुग्णांची विचारपूस केली. डॉ. गिरी म्हणाले की, न्यूरो सर्जरीमध्ये वेदना आणि दु:ख जास्त आहेत. त्यांच्या वेदना कशा कमी होतील आणि त्यांना सर्वोत्कृष्ट उपचार कसा मिळू शकेल यासाठी आम्ही तत्पर असतो. यावेळी त्यांनी रोबोटिक न्यूरो रिहॅबिलिटेशनद्वारे अर्धांगवायू आणि अन्य मेंदूंच्या आजारातील रुग्णांवरील उपचाराचीही माहिती दिली. मेंदूची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे सांगत डॉ. पाखमोडे म्हणाले, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना प्रेमळ वातावरण उपलब्ध करून दिल्यास रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देतो.

टॅग्स :Rinku Rajguruरिंकू राजगुरूnagpurनागपूर