शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

महिलांना घडविण्यासाठी ‘सखीं’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:07 AM

- ‘ती’ला प्रोत्साहित करण्यास किशोरी शहाणे यांची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुळातच मनाने कणखर असलेल्या महिलांना वर्तमानात ...

- ‘ती’ला प्रोत्साहित करण्यास किशोरी शहाणे यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुळातच मनाने कणखर असलेल्या महिलांना वर्तमानात एकाच वेळी दोन फळींवर स्वत:ला सिद्ध करावे लागत आहे. कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्यात उपजतच आहे आणि २१व्या शतकात स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मिळालेले भरारीचे पंख विस्तारण्याचा भावही त्यांच्यात आहेत. अशा दुहेरी जबाबदारीतही स्वत:ला सिद्ध करण्याची किमया महिला साधते आहे. पुरुषांच्या खांंद्याला खांदा मिळवून पुढे चालण्याचा काळ आता जुना झाला. महिला आता एकहाती नेतृत्व स्वीकारत आहेत. विविध क्षेत्रात त्यांचे स्वत:चे अस्तित्व निर्माण झाले आहे. या सर्व यशस्वी महिला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मंगळवारी एकत्र आल्या होत्या. आम्ही घडलो आणि आता आमच्यासारख्याच दुसऱ्या महिलांना घडविण्यासाठी त्यांची ‘सखी’ होण्याचा गजर त्यांनी यावेळी केला. एकमेकांना साहाय्य करत, एकमेकांच्या मैत्रिणी होत गरुडझेप घेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

स्व:कर्तृत्वाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट मांडलेल्या ‘लोकमत वुमेन ॲचिव्हर्स कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा मंगळवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पाईंटमध्ये पार पडला. रोकडे ज्वेलर्स, वाघमारे मसाले, ऑलिव्ह रेसाॅर्ट आणि विदर्भ मीडियाच्या सहयोगाने हा सोहळा पार पडला. यावेळी विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे, वाघमारे फुड प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक प्रकाश वाघमारे, ऑलिव्ह रेसॉर्ट ॲण्ड विला च्या संचालिका संध्या चौकसे आणि विदर्भ मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रंगारी उपस्थित होते. या मान्यवरांच्याच हस्ते कॉफी टेबलचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापिका स्व. ज्योत्स्ना विजय दर्डा यांचे स्मरण करण्यात आले. कॉफी टेबल बुकचे लेखन आणि संपादन वर्षा बासू यांचे आहे तर छायाचित्रांकण महेश टिकले यांचे आहे. यावेळी अनामिका रोकडे व संध्या चौकसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. संचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार पूनम तिवारी-महात्मे यांनी मानले.

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

कॉफी टेबल बुकमध्ये जीवनपट मांडलेल्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी किशोरी शहाणे व प्रायोजकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. तेजस्विनी खाडे, नीलिमा बावणे, सरिता फुंडे, दीपाली तुमाने, दर्शना नवघरे, डॉ. प्रीती मानमोडे, धनश्री गंधारे, स्नेहा बोंद्रे, मैथिली कोवे, रचना वझलवार, डॉ. मनीषा यमसनवार, प्रा. रसिका चाफले, शुभांगी मेंढे, डॉ. आश्लेषा अकीनवार, अनघा वैद्य, अर्चना वांदिले, डॉ. दीपा नंदनवार, लतेश्वरी काळे, नलिनी लांजेवार, नीलिमा रामटेके, रेखा तंवर, रूपाली कोडेवार-मोरे, परिणीता मातुरकर, वर्षा बारई, संघमित्रा मस्के, सोनाली देशपांडे, संगीता सूर्यवंशी, स्मिता मिरे, भारती तिडके, मीना भागवतकर, हेमा डाबरे, प्रा. डॉ. माधुरी नासरे, मंगला कारेमोरे, जयश्री बोरकर, अर्चना सारवे-बावणे, डॉ. अंशुजा किंमतकर, कल्याणी भुरे, मेघा नारनवरे, प्रणाली सरटकर, अर्चना हरडे, सुचिता आगाशे, डॉ. शीतल बल्लेवार-कोकुलवार, डॉ. इंदिरा सपाटे, ॲड. सोनिया गजभिये, मंजूषा चकनलवार, डॉ. माधवी अंभोरे-सांगोळकर या कर्तृत्ववान महिलांना ट्राॅफी आणि कॉफी टेबल बुक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सखींनो, अंतर्मनाने तरुण व्हा : किशोरी शहाणे

मी तरुण म्हणजे काय तर माझे अंतर्मन तरुण असणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:विषयीच्या जबाबदारीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपण स्वत: अंतर्मनाने तरुण असू तर आपल्यावाटे कुटुंबही सतत प्रेरित होईल आणि स्वत:च्या कर्तृत्वालाही योग्य तऱ्हेने चालना देता येईल, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी यावेळी उपस्थित सखींना केले.

दी नाईट थिंकर्सचे सादरीकरण

यावेळी महिलांच्या मनोरंजनाकरिता दी नाईट थिंकर्सच्या वतीने संगीतमय कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. यात गिटार वादन व गायन साहिल गजभिये, कीबोर्डवर ऋषभ ढोमणे, ड्रमवर जैनम शहा यांचा समावेश होता.