लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना झाला आहे. त्यामुळे दर महिन्याला नेमके किती वेतन मिळणार, ठराविक तारखेला वेतन मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कचरा उचल थांबविल्याने शहरात स्वच्छता व्यवस्था कोलमडली होती. याची दखल घेत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या कंपन्यांना सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार व दर महिन्याला ठराविक तारखेला वेतन देण्याचे निर्देश दिले. सोबतच वेतन स्लीप दिली जाणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.काही कर्मचाऱ्यांना १५ दिवसाचे वेतन देण्यात आले. त्यामुळे वेतन कमी असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार नाही. नियमानुसार वेतन दिले जाईल. पहिल्या महिन्याचे वेतन असल्याने किती वेतन मिळते. याची उत्सुकता होती. काहींना १५ दिवसाचे वेतन देण्यात आल्याने गैरसमज झाला होता. सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनश्रेणीच्या आधारे वेतन दिले जाईल. तसेच वेतन स्लीप देण्याचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिली.विशेष म्हणजे दीड महिन्याअगोदरच शहरातील कचरा संकलन अधिक सक्षम करण्यासाठी दहा झोनला दोन भागात विभागून दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. यानुसार झोन १ ते ५ पर्यंतचे कंत्राट ए.जी. एन्वायरोला तर झोन क्रमांक ६ ते १० पर्यंतचे काम बीव्हीजी कंपनीला देण्यात आले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन :आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:43 PM
मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या कंपन्यांना सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार व दर महिन्याला ठराविक तारखेला वेतन देण्याचे निर्देश दिले. सोबतच वेतन स्लीप दिली जाणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
ठळक मुद्देवेतन स्लीप देण्याचे आयुक्तांचे आदेश