लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त असताना पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जमले नाही. परंतु त्यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला शिस्त लावली होती. बिघडलेली आर्थिक घडी नीट करण्याचे काम सुरू केले होते. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन मिळण्याला सुरुवात झाली होती. परंतु मुंढे जाताच वित्त व लेखा विभागाचा कारभार पुन्हा सुस्तावला आहे. दोन आठवडे उलटले तरी वेतन न मिळाल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पेन्शनधारकांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने मनपा कर्मचाऱ्यांना वेतन विलंबाने घेण्याची सवय झाली होती. मात्र मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यात वित्त विभागाला शिस्त लावली होती. परिणामी मागील चार महिने कर्मचाºयांना दर महिन्याला वेतन १० तारखेच्या आत मिळत होते. मात्र मुंढे गेल्यानंतर पहिल्याच महिन्यात १४ तारीख झाली तरी वेतन मिळालेले नाही.मार्च महिन्याचे शिल्लक वेतनही नाहीकोविडमुळे मार्च महिन्याचे वेतन अर्धे देण्यात आले होते. मुंढे यांनी बदली होण्यापूर्वी मार्चचे शिल्लक वेतन सप्टेंबर महिन्यात देण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले होते. मात्र अद्याप हे वेतन मिळालेले नाही. सणासुदीच्या दिवसात वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे कोविड काळात पेन्शन अडकल्याने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:43 PM