लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन एसटी परिवहन प्रशासनाकडून कापले जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाचा प्रभाव नागपुरातही पाहायला मिळाला. ९ जूनच्या रात्रीपर्यंत आंदोलन कायम होते. आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन एसटी महामंडळाच्या महसुलाचेही नुकसान झाले होते. आंदोलनादरम्यान दोन दिवसात ७५ टक्के बसेसची चाके थांबली होती. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे खासगी वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली होती. संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत एसटी परिवहन प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. परंतु आता संपात सहभागी जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात करण्यात येणार आहे.काम नाही तर वेतनही नाही‘दोन दिवस संप पुकारल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचा मोठा महसूल बुडाला. त्यामुळे काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे.’अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.
संपातील दोन हजार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:21 AM
काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन एसटी परिवहन प्रशासनाकडून कापले जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.
ठळक मुद्देप्रशासनाकडून कारवाई : वेतनवाढीसाठी केले होते काम बंद आंदोलन