शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ऑनलाईन, ऑफलाईनच्या विळख्यात शिक्षकांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:14 PM

शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली.पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही.

ठळक मुद्देऑनलाईनमध्ये त्रुटी : ऑफलाईन बिल स्वीकारायला अधिकारी नाही तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली. पण या यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शासनाकडून कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन वेतन करण्याचे निर्देश दिले जात आहे. गेली दोन महिने ऑफलाईन वेतन काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता तर सप्टेंबरचे वेतन ऑनलाईन होईल असे सांगितले होते. पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही.शिक्षण विभागाकडून शिक्षकांचे वेतन जून महिन्यापासून शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा, ठाणे, जालना जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन ऑनलाईन करण्यात येणार होते. मात्र, यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे संबंधित तीन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यापर्यंतचे वेतन ऑफलाईन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वेतन पथक अधीक्षकाने ऑगस्ट महिन्यापर्यंतचे वेतन देयके ऑफलाईन स्वीकारले. सप्टेंबरपासून वेतन देयके ऑनलाईन स्वीकारण्याच्या सूचना शासनाच्या होत्या. त्यामुळे शाळांनी वेतन देयके ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत त्रुटी असल्याने वेतन देयके स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याने वेतन देयके ऑफलाईन स्वीकारावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.जानेवारीपासून तांत्रिक पेच सुटला नाहीदेशात 'डिजिटल इंडिया'चा नारा देत सर्व व्यवहार डिजिटल करण्यावर भर दिला जात असतानाच राज्यातील शिक्षण विभागाच्या शालार्थ सॉफ्टवेअरमध्ये झालेला तांत्रिक दोष नववा महिना लागल्यानंतरी दूर झालेला नाही. अशात शासनाने ऑनलाईन ऑफलाईनच्या सूचना वारंवार दिल्या. सप्टेंबरचे वेतन ऑनलाईन स्वीकारण्याच्या सूचना करताना यंत्रणेतील त्रुटी दुरुस्त झाल्या नाही. परिणामी वेतन देयके स्वीकारल्या गेली नाही. त्यामुळे १ ऑक्टोबरला वेतन मिळणार की नाही अशी भीती शिक्षकांना आहे.शिक्षकांची वेतन देयके तयार होतात नेट कॅफेतूनशिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा राबविली. परंतु ते कसे ऑपरेट करावे याचे प्रशिक्षण, माहिती लिपिक वर्गाला दिली नाही. त्यामुळे बहुतांश शाळेतील वेतन देयके ही नेट कॅफेतून काढली जात आहे. गेल्या नऊ महिन्यात ऑनलाईन प्रणाली दुरुस्त झाली नाही, वेतन देयके अजूनही बाहेरून भरावे लागत आहे. सर्वच अप्रशिक्षित असेल तर डिजिटलचा अट्टाहास का, उगाच शिक्षकांना मनस्ताप का, असा सवाल शिक्षकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाचा वेठीस धरण्याचा प्रकारएकीकडे ऑनलाईनची यंत्रणा ठप्प आहे. यासदंर्भात सचिव, आयुक्त, उपसंचालक, वेतन पथक अधीक्षक यांनाही जाणीव आहे. त्यामुळे ऑफलाईन देयके स्वीकारावी या मागणीसाठी आंदोलनही केले आहे. तरीसुद्धा मंगळवारी वेतन पथक अधीक्षकाने देयके ऑनलाईनच सादर करावे, अशा सूचना दिल्या आहे. हा प्रकार म्हणजे प्रशासनाकडून शिक्षकांना वेठीस धरण्याचा आहे.प्रमोद रेवतकर, सचिव, विमाशी संघ

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन