शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

शटर अर्धवट ठेवून विक्री; १५ दुकानावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही भागात कापड विक्री, इलेक्ट्राॅनिक वस्तू, सौंदर्य प्रसाधने यासह अन्य काही दुकाने सुरू होती. अशा १५ दुकानांवर गुरुवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी कारवाई करून १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला.

नागपूर जिल्ह्यात दररोज सहा ते सात हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमण वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जारी केले आहे. असे असतानाही काही दुकानदारांनी अर्धे शटर खाली करून विक्री सुरू ठेवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लक्ष्मीनगर झोन पथकाने छत्रपती चौकातील आर्टिफास्ट प्रोजेक्ट लि.ला १५ हजाराचा दंड केला. धरपमेठच्या पथकाने लक्ष्मीभवन चौकातील अजंता स्टोअर्सला ५ हजार, धंतोली येथील के. असोसिएटला ५ हजार, हनुमाननगर झोन पथकाने मानेवाडा रोडवरील विठ्ठलकृपा रेडिमेड ५ हजार, रघुकुल ५ हजार, गांधीबाग झोनच्या पथकाने भावसार चौकातील आराधना साडी सेंटरला १० हजार, त्रिवेणी साडी सेंटरला २० हजार, परिवार मॅचिंग सेंटरला २० हजार, लव्हली नक्सला १० हजारांचा दंड केला. सतरंजीपुरा झोन पथकाने जय वैष्णवी कलेक्शनला १० हजार, लकडगंज पथकाने रामकृष्ण स्टीलला १० हजार, मंगळवारी झोनच्या पथकाने पीबीएम पोलिटेक्सला १५ हजार, आर.एस. ऑटोमोबाईलला ५ हजार, मिनरल ट्री एक्सट्रा ५ हजार, टी.एम. फिदा अली अ‍ॅन्ड सन्स ५ हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात आला.

...

झोन प्रतिष्ठानांची तपासणी दंड

लक्ष्मीनगर ४ १५०००

धरमपेठ ७ १००००

हनुमाननगर २ १००००

धंतोली ४ ००

नेहरूनगर ४ ००

गांधीबाग ५ ६००००

सतरंजीपुरा २ १००००

लकडगंज १५ १००००

आसीनगर १२ ००

मंगळवारी ४ ३००००

एकूण ५९ १४५०००