शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री : दुय्यम निबंधकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 9:04 PM

बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेपाच कोटींच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये ही विक्री प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या दुय्यम निबंधकाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देजमीन मालकाच्या मृत्यूनंतर बनविली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेपाच कोटींच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये ही विक्री प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या दुय्यम निबंधकाचाही समावेश आहे.सोनबा गुलाबराव मुसळे (वय ६१, रा. सुभाष रोड, द्रोणाचार्यनगर) यांनी मानकापूरमधील खसरा क्रमांक २८१५ मध्ये १२ क्रमांकाचा भूखंड खरेदी केला होता. या जमिनीचे मूळमालक श्यामराव भगवान रोहणकर आणि त्यांचे वारस अरुण श्यामराव रोहणकर यांच्यासोबत खरेदीविक्रीचा व्यवहार करून २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यासंबंधीची रितसर नोंदणीही केली होती. श्यामराव रोहणकर यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी रमण राधेश्याम शिरोया (रा. सूर्यनगर पारडी) याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी तयार करून घेतली. त्यानंतर हा भूखंड आरोपी सैफुद्दीन इस्माईल टोपीवाला याला विकला. आरोपींनी त्यासाठी ६ सप्टेंबर २००५ चे खरेदी खत बनविले आणि या भूखंडावर अतिक्रमण (कब्जा) केले. या गुन्ह्यात आरोपी शिरोया आणि सैफूद्दीनला शब्बीर हुसेन इस्माईल टोपीवाला, अब्बूबकर हाजी अब्दुल मजिद (रा. मानकापूर) सदाकत हुसेन लियाकत हुसेन (रा. कळमना), शादाब (रा. मानकापूर) तेव्हाचे दुय्यम निबंधक आणि अन्य एका आरोपीने या बनवेगिरीत सहभाग नोंदवला. दरम्यान, मुसळे यांनी आपली मूळ कागदपत्रे दाखवून त्यासंबंधाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. सविस्तर चौकशी केल्यानंतर मानकापूर पोलिसांनी विविध कलमानुसार उपरोक्त आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी