शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विधवेच्या गरिबीचा फायदा घेत चार दिवसांच्या मुलीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 7:45 AM

Nagpur News श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची मुलगी विकल्याची बाब समोर आली.

ठळक मुद्देबदल्यात २ लाख ९० हजार घेतलेअहमदाबादमध्ये नेऊन विकले

योगेश पांडे नागपूर : बाळांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. अटकेत असलेली श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची मुलगी विकल्याची बाब समोर आली. एका विधवेच्या गरीबीचा फायदा घेत त्यांनी तिला जाळ्यात ओढले व संबंधित दांपत्याला २ लाख ९० हजारांत विक्री केली.

बाळांच्या खरेदी-विक्रीत श्वेता खानने विविध राज्यांत सौदे केले होते. छत्तीसगड, तेलंगाणा, गोंदिया येथील प्रकरणे समोर आली व पोलिसांनी संबंधित मुलांची सुटकादेखील केली. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी अहमदाबाद येथे एका नवजात मुलीची विक्री केल्याची माहिती दिली. पैशांची गरज असलेली एक गर्भवती विधवा सचिन पाटीलच्या संपर्कात आली होती. अनैतिक संबंधातून ती गर्भवती झाली होती. सचिनने तिच्या गरजेचा फायदा घेतला व तिला बालाघाट येथे दोन महिने घेऊन गेला. तिथेच तिची प्रसुती झाली. यादरम्यान त्याने व श्वेताने अहमदाबाद येथील विशाल चंदनानी यांची बहीण मोनिका सुलतीयानी व जावई विजय यांना ८ सप्टेंबर रोजी बाळाची विक्री केली. दत्तक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच ताबा देत असल्याची थाप श्वेताने मारली होती. इतकेच नव्हे तर मुलीचे जन्म प्रमाणपत्र व इतर दस्तावेज पाठविण्यात येईल, असे आश्वासनदेखील दिले होते. मात्र त्यानंतर श्वेता व सचिनने आपले फोन बंद केले.

या खुलाशानंतर पोलिसांनी श्वेता व सचिनसह श्वेताचा पती मकबूल खान, डॉ.प्रवीण सिंग बायस, विशाल चंदनानी, मोनिका सुलतयानी व विनय सुलतयानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीची बडोदा येथून सुटका केली असून तिघांनाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूत प्रतिबंधक कक्षातर्फे ही कारवाई करण्यात आली.

डिप्रेशनमध्ये गेली होती विकत घेणारी महिला

विनय सुलतयानीचा अहमदाबादमध्ये डेकोरेशनचा व्यवसाय आहे. दोघांनाही मुल होत नसल्याने त्यांनी आयव्हीएफ प्रक्रिया केली होती. त्यानंतर मोनिकाला गर्भवती झाली होती. १५ मार्च रोजी तिला मुलगीदेखील झाली. मात्र चार महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. यानंतर मोनिका डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हापासून नातेवाईक दत्तक मुलगा किंवा मुलीचा शोध घेत होते. एका दूरच्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांना सचिन पाटीलचा क्रमांक मिळाला होता. सुरुवातीला बोलणी झाल्यावर ती फिस्कटली होती. मात्र सिंधी कुटुंबातील एक मुलगी दत्तक द्यायची आहे अशी श्वेताने थाप मारून सौदा ठरविला होता. नागपुरातील महाकाळकर भवन येथील एका इस्पितळात पुढील सौदा झाला होता. मुलीला घेण्यासाठी गुजरातमधील तिनही आरोपी विमानाने नागपुरात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी