लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो, म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणांमधील ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांकडून हे फटाके वसाहतींच्या गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. गांधीबाग, जरीपटका, इतवारीतील लालईमली परिसर व आता सीए रोडवरील अनेक दुकानदार फटाक्यांच्या बंदुकी विकतात. परंतु यातील काही बंदुकीसोबतच चिनी फटाकेही विकतात. यात चिनी रॉकेटपासून, भूचक्र, पटक बॉम्ब (पॉपपॉप), पेन्सील, पायली, विविध आकारातील बॉम्ब यासारख्या अनेक फटाक्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार, अनेक दुकानदारांनी चिनी फटाक्यांचा हा साठा दुकानात न ठेवता कुणी आपल्या घरी तर कुणी भाड्याच्या खोलीत केला आहे. येथून हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत किंवा ग्राहकांच्या घरात पोहचत आहे.धोकादायक हॅण्डग्रेनेडगेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिनी फटाके आणखी धोकादायक प्रकारात आले आहेत. पूवी ‘पॉपपॉप’ हा पावइंचात येत होता. यावर्षी तो एक आणि दोन इंचात आला आहे. कागदाच्या वेष्टणात असलेल्या या फटाक्याला खाली पटकताच तो फुटतो. दुसरा फटका म्हणजे, मिसाईल. एका चिनी बंदुकीत गोळीसारखा वापरला जाणारा हा फटका आहे. खºयाखुºया बंदुकीसारखाच याचा वापर होतो. सर्वात धोकादायक म्हणजे, ‘हॅण्डग्रेनेड’ फटाका. याचा वापर मूळ ‘ग्रेनेड’ सारखाच होतो. या फटाक्याला एक हूक दिला आहे. हा हूक एका दोरीला बांधला आहे. हूक खिचताच फटाक्यातून धूर निघतो आणि काही सेकंदातच तो फुटतो.पोटॅशियम परक्लोरेटवर बंदीचिनी फटाक्यांमध्ये हलक्या प्रतिची पोटॅशियम परक्लोरेट पावडर वापरली जाते. या पावडरची किंमत सुमारे ५० रुपये किलो आहे. तर भारतीय फटाक्यांसाठी वापरली जाणारी पावडर ३०० रुपये किलो आहे. त्यामुळे चिनी फटाके किती धोकादायक आहेत हे सहज लक्षात येते. भारतात फटाक्यांची निर्मिती करताना पोटॅशियम परक्लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे.चिनी फटाक्यांमध्येही बनावटचिनी फटाक्यांवर निर्बंध आल्याने नागपुरात त्याच्यासारखे दिसणारे फटाके बाजारात आले आहेत. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका नागपुरात मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. ठोक विक्रेत्यांकडे तो आठ ते दहा रुपये किमतीला उपलब्ध आहे. परंतु तो फुटतच नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.आरोग्यास हानिकारकचिनी फटाके आरोग्यास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. या फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:01 AM
चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो, म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे.
ठळक मुद्देकधीही धोका होण्याची शक्यता : गांधीबाग, इतवारी, जरीपटका वसाहती बनल्या स्फोटांचे अड्डे