नागपूर : रिपब्लिकन आघाडीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सैनिकांना मानवंदना देण्यात येणार आहे. रिपब्लिकन आघाडीतर्फे १ जानेवारीला दुपारी १२ वाजता इंदोरा चौकात सामूहिक मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेजवळ शूर सैनिकांना सामूहिक मानवंदना देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय एकता संमेलन, मुशायरा २ रोजी
नागपूर : नववर्षानिमित्त कारवाँ-ए-अदब मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने २ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता मोमिनपुराच्या तकीया दिवाणशाह हॉलमध्ये मौलाना मजहरुल हक यांच्या स्मृतिनिमित्त राष्ट्रीय एकता व मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक इमरान फैज यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या वर्षात आपसातील बंधूभावाचा संदेश देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. शरफुद्दीन साहिल मार्गदर्शन करतील. शायरीच्या कार्यक्रमात देशप्रेम, बंधूभावाचा संदेश देणाऱ्या रचना सादर करण्यात येतील. नसीम नागपुरी, शमशाद शाद, जमील सरोश, तन्हा नागपुरी, नईम अन्सारी, खलील इब्राहिम, अजहर हुसैन, शादाब अंजुम आदी शायर आपल्या रचना सादर करणार आहेत.
............