नागपूर : इतवारीस्थित गंगा - जमुना या वारांगनांच्या वस्तीवरील पोलिसांच्या कारवाईला ‘सॅल्युट तिरंगा’ या स्वयंसेवी संघटनेने समर्थन दिले आहे. संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा डिंपी बजाज यांनी शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन यासंदर्भातील पत्र दिले. गंगा - जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून देहविक्रय करविला जातो. सोबतच यामुळे आजुबाजूच्या वस्तीमधील महिलांनादेखील बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. हा प्रकार बंद केला तर तेथील महिलांसमोरील मोठी समस्या दूर होईल. तसेच अवैध धंद्यांवरदेखील नियंत्रण येईल. शिवाय महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेला आणखी बळकटी मिळेल, अशी भावना संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली. यावेळी ‘सॅल्युट तिरंगा’ संस्थेच्या सदस्या अर्चना हिवसे, कुसुम कुकरेजा, हिमांशी चांदवानी प्रामुख्याने उपस्थित होते.
गंगा-जमुनातील कारवाईला ‘सॅल्युट तिरंगा’चे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:12 AM