लोकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक योगदानाबद्दल गुमगाव येथील भूमीत जन्मलेल्या गुरुजनांप्रति आदर आणि कृतज्ञतेची भावना जोपासत येथील एकता गणेशाेत्सव मंडळाच्या वतीने ‘थॅंक यू टीचर’ उपक्रमांतर्गत गुलाब रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन शिक्षकांचा गाैरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक ढोमणे हाेते. प्रमुख अतिथी म्हणनू सेवानिवृत्त शिक्षक विनायक इंगळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक फिरोज कुरेशी, श्यामराव वसाके यांची उपस्थिती हाेती. याप्रसंगी गुमगाव परिसरात जन्मलेल्या नरेंद्र कुंभारे, चंद्रकांत सोनकुसळे, मधुसुदन चरपे, उमेश आष्टनकर, चंद्रकांत दुर्गे, गणेश दांडेकर, चंदू मून, राजेश आष्टनकर, होमदेव डेकाटे, सतीश फुलकर, जगदीश बारापात्रे, प्रशांत सोनकुसळे, नितीन आष्टनकर, शैलेश लोणारे, नंदकिशोर सोमकुवर, किशोर हिंगे, अजय नंदनवार, रमेश नंदनवार, प्रीती कोहाड, चंद्रशेखर सालवटकर, रवींद्र दुर्गे, नीलेश कडवे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश आष्टनकर यांनी केले. संचालन रवींद्र कुंभारे यांनी केले, तर मधुसूदन चरपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजय निमजे, जगदीश वानोडे, सानिकेत बोरकर, वेदांत उपासे, गोपाल निमजे आदींनी सहकार्य केले.