नागपूर : त्रेमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केल्याप्रकरणी श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर सुधीर जोशी याचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी जोशी आणि इतरांविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियमच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. यानंतर समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. १२३४ गुंतवणूकदारआतापर्यंतच्या तपासानुसार समीर जोशी आणि सहकाऱ्यांनी १२३४ गुंतवणूकदारांची १०० कोटी ८० लाख १४ हजार ४२८ रुपयांनी लुबाडणूक झालेली आहे. या प्रकरणात समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह मनोज सुधीर तत्त्वादी, निशिकांत मायी, श्रीकांत प्रभुणे, दिलीप डांगे, नितीन केसकर, मोहन पितळे, मुकुंद पितळे, शंतनू कुऱ्हेकर आणि आनंद जहांगीरदार, असे ११ आरोपी आहेत. असा येत होता पैसाश्रीसूर्यामध्ये मुख्य पदावर कार्यरत असलेल्या एका साक्षीदाराच्या माहितीनुसार २००५ मध्ये ही कंपनी सुरू झाली. जुलै २०११ पर्यंत २८०० गुंतवणूकदार झाले होते. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये सदस्यत्व शुल्क घेण्यात आले होते. ही रक्कम २ कोटी ८० लाख रुपये जमा झाली होती. आॅगस्ट २०११ नंतर २० हजार रुपये सदस्यत्व शुल्क घेणे सुरू करण्यात आले होते. गुन्हा दाखल होईपर्यंत २२०० गुंतवणूकदार झाले होते. त्यांच्याकडून ४ कोटी ४० लाख जमा झाले. अर्थात ५१०० गुंतवणूकदारांकडून ७ कोटी २० लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. ही रक्कम नापरतावा होती. श्रीसूर्या फाऊंडेशनकरिता प्रत्येक सदस्याकडून एक हजार आणि आजीवन वृत्तपत्र शुल्क ३६० रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम ६८ लाख रुपये एवढी होते. गुंतवणूकदारांची २३९ कोटी २६ लाख आणि सदस्य शुल्क धरून एकूण २४७ कोटी १४ लाख रुपये या कंपनीकडे जमा होते.
ठगबाज समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: September 22, 2015 4:11 AM