जोशीने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. याप्रकरणात राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. जोशीला १५ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे.
समीर जोशीच्या जामिनावरील सुनावणी तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 4:04 AM