समीर पालतेवारांना हायकोर्टातून अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 08:16 PM2019-07-11T20:16:48+5:302019-07-11T20:18:04+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.

Sameer Paltewar gets anticipatory bail in the High Court | समीर पालतेवारांना हायकोर्टातून अटकपूर्व जामीन

समीर पालतेवारांना हायकोर्टातून अटकपूर्व जामीन

Next
ठळक मुद्देमेडिट्रिना हॉस्पिटल आर्थिक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.
सीताबर्डी पोलिसांनी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला. पालतेवार यांनी बनावट व्हाऊचरद्वारे हॉस्पिटलच्या खात्यातील मोठी रक्कम परस्पर काढून घेतली व या व्यवहाराचा कुठलाही हिशेब ठेवला नाही असे विविध गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर व अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Sameer Paltewar gets anticipatory bail in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.