नागपूर : समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी रविवारी रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी राष्ट्र्यी स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधल गोडवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी जावून आदरांजली अर्पण केली. समीर वानखेडे हे सपत्नीक स्मृती मंदिरात गेल्या अनेकांच्या भूवया उंचावल्या.
समीर वानखेडे हे रविवारी सपत्नीक नागपुरातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यानंतर वानखेडे यांनी सपत्नीक रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिलीय वानखेडे हे एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते.