लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सिनेट सदस्यपदी डॉ. समीर गोलावार यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. गोलावार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे (पीएसएम) सहयोगी प्राध्यापक असून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या राज्य सचिव पदावरही कार्यरत आहे.डॉ. गोलावार यांची २०१२ मध्ये विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली होती. सर्वात जास्त मते घेणारे ते एकमेव उमेदवार होते. याच पाच वर्षांच्या काळात शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न विद्यापीठास्तरावर त्यांनी सोडविले. चार वर्षे ते विद्यापीठाच्या अर्थसंकल्प समितीवरही सदस्य म्हणून होते. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम ‘स्पंदन’चे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इन्टरझोनल क्रीडा महोत्सव शिबिराचे आयोजनही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोलावार म्हणाले, सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांमधील दुव्याचे काम करणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्येला प्राधान्य दिले जाईल. विशेषत: विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठस्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करेल.
समीर गोलावार यांची सिनेट सदस्यपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 9:54 PM