शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 9:48 PM

समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातून जाणार २८ किलोमीटरचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे.समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले काम पाहण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे बुधवारी पत्रकारांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी ० ते ३१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीला १ जानेवारी २०१९ रोजी १५६५ कोटीचे काम देण्यात आले आहे. या कंपनीला ३० महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा कालावधी शासनाच्या वतीने ठरवून देण्यात आला आहे. या कालावधीत हे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील ३१ ते ८९ किलोमिटरचे काम अ‍ॅफकॉन नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम १५ जानेवारी २०१९ रोजी देण्यात आले असून हे काम संबंधित कंपनीला ३३ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. १ जानेवारी २०१९ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अशोक जगशेट्टीवार यांनी दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अशोक जगशेट्टीवार आणि अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील २० गावातून जाणार महामार्गसमृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्याच्या २० गावामधून जाणार आहे. त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यात शेतकऱ्यांना ५ पट पैसे देऊन त्यांच्या मर्जीनुसार जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यानंतरही त्यांच्या जमिनीवरील पिके वाया जाऊ नयेत यासाठी पीक निघेपर्यंत शासनाने त्यांनी मुभा दिली, अशी माहिती हिंगणाचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.मिहानच्या मागील बाजूने महामार्गाचा शुभारंभहिंगणा तालुक्यातील शिवमडला हे समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट  राहणार असून येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होणार आहे. हा भाग मिहानच्या मागील असून येथून मिहान, हिंगणा तालुका, अमरावती येथील वाहने या मार्गावर प्रवेश करू शकतील.कामावर राहील ‘एनएमएससीईडब्ल्यू’चा वॉचसमृद्धी महामार्गाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कंपनी तयार करण्यात आली आहे. ‘एनएमएससीईडब्ल्यू’ (नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे) असे कंपनीचे नाव आहे. ही कंपनी समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी कंपनीला २३.७३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘इंटर चेंज’समृद्धी महामार्ग हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होणार आहे. शिवमडका येथे मिहानमधील वाहने, नागपूर, हिंगणा तसेच अमरावतीकडून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने जाऊ शकतील. त्यानंतर मध्ये कोणतेच वाहन या महामार्गावर जाण्याची सुविधा नाही. शिवमडकानंतर ६.५ किलोमिटर अंतरावर दाताळा येथे दुसरा ‘इंटर चेंज’ राहील. दाताळा या इंटर चेंजवर बुटीबोरीकडून येणारी वाहने समृद्धी महामार्गावर जाऊ शकतील आणि समृद्धी महामार्गावर मुंबईकडून येणारी वाहने दाताळा येथे महामार्गाच्या बाहेर पडू शकतील. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील सेलडोह या तिसऱ्या ठिकाणी ‘इंटर चेंज’ राहणार आहे. तर वर्धा जिल्ह्यातत येळाकेळी आणि विरुळ असे दोन इंटरचेंज राहतील.सव्वातीन मीटरच्या भिंतीचे कवचसमृद्धी महामार्गाला दोन्ही बाजूने सव्वातीन मीटर उंच असलेलल्या भक्कम भिंतीचे सुरक्षा कवच राहणार आहे. या भिंतीमुळे आजूबाजूच्या शेतातील पाळीव प्राणी, नागरिक, असामाजिक तत्त्व या मार्गावर प्रवेश करू शकणार नाहीत. भिंतीच्या वर ताराची जाळी बसविण्यात येणार आहे.हळदगावला फ्लाय ओव्हरहिंगणामधील शिवमडका येथून २६ किलोमीटरवर समृद्धी हायवे फ्लाय ओव्हरवरून जाणार आहे. खालून राष्ट्रीय महामार्गाची वाहने जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गात अडथळा येऊ नये यासाठी हळदगाव या पॉईंटवर फ्लाय ओव्हर तयार करण्यात येणार आहे.दाताळाला वाढणार रुंदीसमृद्धी महामार्गाची सुरुवात शिवमडका येथून होणार आहे. शिवमडका ते दाताळा हा महामार्ग ६.५ किलोमीटरपर्यंत ८० मीटर रुंदीचा राहणार आहे. परंतु दाताळापासून समृद्धी महामार्गाच्या रुंदीत वाढ होणार आहे. दाताळा येथून हा महामार्ग तब्बल १२० मीटर रुंदीचा होणार आहे.ताशी १५० किलोमीटरने धावतील वाहनेसमृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई ७०० किलोमीटरचा राहणार आहे. सहा पदरी (लेन) असलेल्या या महामार्गावर वाहने दर तासाला १५० किलोमीटरप्रमाणे धावणार आहेत. यानुसार नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सात तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूर