लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ ं(अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिकाºयांनी शक्ती पणाला लावली. मात्र, मतदानाची टक्केवारी घटल्याने भाजपाची धाकधुक वाढली होती. अखेर काट्याच्या लढतीत भाजपाचे उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज भोरात यांचा ४६३ मतांंनी पराभव केला. गवई यांना ५७११ मते मिळाली तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली.गुरुवारी सकाळी १० वाजता सीताबडीं येथील बचतभवन येथे मतमोजणी झाली. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यत काँग्रेसने चांगली टक्कर दिली. अखेर गवई विजयी झाल्याचे घोषित होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्याने जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात आली.आठ उमेदवार मैदानात होते. भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता. दोन आठवड्यापासून या प्रभागात जोरदार प्रचार मोहीम राबविली. तब्बल १२० कॉर्नर बैठका घेतल्या. मात्र २४.३३ टक्केच मतदान झाल्याने धाकधूक वाढली होती. काँँग्रेसकडूनही विजयाचा दावा केला जात असल्याने निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रभागातील ५७,६९३ मतदारांपैकी १४,०३५ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला . यापैकी गवई यांना ५७११ तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. बसपाच्या नंदा झोडापे यांना १६७५, अपक्ष गौतम कांबळे यांना ६६८, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे सहदेव नारनवरे यांना १३०, अपक्ष मनोज इंगळे १४ ,वंदना जीवने ४२६, तर सुनील कवाडे यांना १५ मते मिळाली. १४७ मतदारांनी नोटाचा वापर केला.पाचव्या व सहाव्या फेरीने वाढविला गवईंचा बीपीमतमोजणीच्या पहिल्या चार फेरीत गवई यांनी थोरात यांच्यावर ७७७ मतांची आघाडी घेतली होती. मात्र पाचव्या व सहाव्या फेरीत थोरात यांना १४४६ तर गवई यांना ८८६ मते मिळाली. गवई यांचे मताधिक्य २१७ मतांवर आल्याने निकालाची उत्सुकता वाढली होती. सातव्या फेरीत पुन्हा गवर्इंनी थोरात यांच्यापेक्षा ५४ मते अधिक मिळाली. अखेरच्या फेरीत गवई यांना अधिक मते घेत विजय सुनिचित केला.भाजपाचा जल्लोषसंदीप गवई यांना विजयी झाल्याचे घोषित करताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बचत भवनापुढे जल्लोष केला. महापौर नंदा जिचकार, दक्षिण पश्चिमचे प्रभारी प्रा. राजीव हडप, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे नगरसेव अविनाश ठाकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, भाजपाचे शहर पदाधिकारी भोजराज डुम्बे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, रमेश भंडारी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाºयांनी गवई यांचे अभिनंदन केले.फेरमतमोजणी फेटाळली, काँग्रेसची नारेबाजीप्रभाग ३५ मधील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेसचे उमेदवार पंकज थोरात यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी शिरीष पांडे व अन्य अधिकाºयांनी थोरात यांचा अर्ज फेटाळला़ यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बचत भवनासमोर घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. मतमोजणीत झालेला घोळ उघडकीस येऊ नये यासाठीच फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केला. अधिकाºयांनी दाद दिली नाही़ यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नारेबाजी करून रोष व्यक्त केला. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.माझा नव्हे तर कार्यक र्त्यांचा विजय : संदीप गवईभाजपाचे बूथ पातळीवर संघटन मजबूत आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात सुरू केला असलेला विकास कामांचा धडाका यामुळे मला हा विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया संदीप गवई यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली़ नगरसेवक असताना गत काळात केलेली विकास कामे विचारात घेता पक्षाने विश्वास दर्शवून मला पुन्हा संधी दिली. याची मतदारांनाही जाणीव होती. त्यांनी भाजपावर विश्वास दर्शवून मतदारांनी भाजपाला कौल दिला. कामकाजाचा दिवस आणि मतदारांच्या घरांपासून सुमारे दोन ते तीन किमी दूर अंतरावर मतदान केंद्रे होती. तसेच, उमेदवारांना मतदार याद्या उशिरा मिळाल्यामुळे सर्वाशी संपर्क साधता आला नाही. त्यातच मतदार याद्यांमधील घोळ यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होती़ मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची गरज असल्याचे गवई म्हणाले. प्रभागाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे. मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही त्यांनी दिली.नगरसेवक म्हणून पुन्हा संधीसंदीप गवई यांनी आपल्या राजकीय जीवनात आजवर पाच निवडणुका लढल्या. त्यात महापालिकेच्या तीन निवडणुकांचा समावेश आहे. २००७ साली बजरंगनगर वॉर्डमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र २०१२ साली व्हीएनआयटी प्रभागातून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा त्यांना नगरसेवकपद मिळाले आहे़ दरम्यान, गवई यांना भंडारा-गोंदिया विधान परिषद आणि उमरेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतही याआधी पराभव पत्करावा लागला आहे. या विजयामुळे संदीप गवई यांचे राजकीय पुनरु ज्जीवन झाले आहे. नगरसेवक म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळाली.
संदीप गवर्इंची स्वप्नपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:54 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ ं(अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती.
ठळक मुद्देकाट्याच्या लढतीत निसटता विजय : भाजपाचा जल्लोष