लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केवळ संघाची प्रार्थना, गणवेश यांच्यात असलेली समानता हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख नाही. तर भारतातील विविधता व त्यात सामावलेली एकात्मता येथे दिसून येते. संघाच्या शिक्षावर्गातून कुठलेही प्रमाणपत्र मिळत नसले तरी यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून व संस्कारांमधून स्वयंसेवक घडतात. या वर्गातून शिक्षित होणारे स्वयंसेवक देशाच्या सेवेसाठी समर्पितच असतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सोमवारपासून संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संघाचे प्रशिक्षण वर्ग प्रमाणपत्रासाठी नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:31 PM
केवळ संघाची प्रार्थना, गणवेश यांच्यात असलेली समानता हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख नाही. तर भारतातील विविधता व त्यात सामावलेली एकात्मता येथे दिसून येते. संघाच्या शिक्षावर्गातून कुठलेही प्रमाणपत्र मिळत नसले तरी यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून व संस्कारांमधून स्वयंसेवक घडतात. या वर्गातून शिक्षित होणारे स्वयंसेवक देशाच्या सेवेसाठी समर्पितच असतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देदत्तात्रेय होसबळे : तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात