लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्था आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उमरेड शहरात स्वच्छता अभियान आणि जनजागरण रॅलीचे आयोजन केल्या गेले. वाढत्या डेंग्यू आजाराबाबतचे फलक हातात घेत छायाचित्रकारांनी लक्ष वेधले. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीसुद्धा केल्या गेली.
संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक येथून ही रॅली मुख्य मार्गाने काढण्यात आली. समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात करण्यात आला. याप्रसंगी दिवंगत फोटोग्राफर्सना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनिल येवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. समर भगत, दत्तू जिभकाटे, सुरेश देशमुख, उमेश बोरकर, मनीष शिंगणे, विशाल बावणे, नरेंद्र बालपांडे, सोनू उके, प्रमोद खेडकर, आकाश महतो, अभिलाष सोनुने, विष्णू गावंडे, सोनू गणवीर, आकाश चिमूरकर, रूपेश महाल्ले, अशोक तामगाडगे, अमोल परमारे, सचिन धारणे, कुणाल लव्हे, दर्शन गणवीर, हितेश डेहनकर, अंकुश वाघमारे, सौरभ वानखेडे, विजय वानखेडे, सचिन चाचरकर, दुर्योधन शास्त्रकार, रवी बानकर, समीर निकाळजे, शुभम नानवटकर, राहुल खेडकर, प्रतीक आंबेकर, मुकेश भाजीपाले, वसंता बालपांडे, ऋषभ ढेंगरे, पवन चकोले, वासुदेव सिर्सीकर, मोहन वानखडे आदींनी सहकार्य केले.