स्वच्छता पंधरवड्यात १६ सप्टेंबरला स्वच्छता जागरूकता, १७ सप्टेंबरला स्वच्छ परिसर, १८ आणि २० सप्टेंबरला स्वच्छ रेल्वेस्थानक, २१ सप्टेंबरला स्वच्छ रेल्वेगाडी, २२ सप्टेंबरला सेवा दिवस, २५ सप्टेंबरला स्वच्छ आहार, २६ सप्टेंबरला स्वच्छ प्रसाधनगृह, २८ सप्टेंबरला स्वच्छ नीर दिवस, २९ सप्टेंबरला स्वच्छ संवाद दिवस, ३० सप्टेंबरला स्वच्छता समीक्षा, १ ऑक्टोबरला सत्यनिष्ठा आणि २ ऑक्टोबरला स्वच्छ सर्वोदय थीमवर कार्य करण्यात येणार आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी १६ सप्टेंबरला मोतीबाग क्रीडा मैदान ते बेलिशॉप कॉलनी, मोतीबाग कॉलनीत प्रभातफेरी काढण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल, वरिष्ठ क्रीडा अधिकारी आदित्य सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीत खेळाडू, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना स्वच्छतेप्रति जागरूक करण्यात आले. रेल्वे कॉलनी, परिसरात श्रमदान करून सफाई करण्यात आली. डीआरएम उप्पल यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सर्व रेल्वेस्थानक, युनिट, कार्यालयात स्वच्छतेची शपथ दिली. रेल्वेस्थानक, रेल्वे परिसरात बॅनर, पोस्टर, पथनाट्य आणि उद्घोषणेच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
...........