कन्हान : वराडा (ता. पारशिवनी) येथे काेराेना संक्रमण व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही साखळी ताेडण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अग्निशमन दलाच्या मदतीने रविवारी (दि. २८) संपूर्ण गावाचे सॅनिटायझेशन करण्यात आले.
गावातील काेराेना साखळी ताेडण्यासाठी संपूर्ण गावाच्या सॅनिटायझेशनचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार वरुणकुमार सहारे, पंचायत समिती सदस्य निकिता भारद्वाज व बाजार समिती संचालक सीताराम भारद्वाज यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हाेकार देताच वेकाेलिच्या कामठी ओसीएम काेळसा खाण प्रशासनाची मदत मागितली. त्यांच्या अग्निशमन दलाचे जवान व फाय फायटिंग मशीनच्या मदतीने फवारणी करीत संपूर्ण गावाचे सॅनिटायझेशन करण्यात आले, अशी माहिती सरपंच विद्या चिखले यांनी दिली. यावेळी विद्या चिखले, वेकाेलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक एस. आर. तलनकर, साहिल गजभिये, शुभम शिंगणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हजर हाेते.