शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

संजय चहांदेंनी मागितली हायकोर्टाची क्षमा

By admin | Published: December 21, 2015 3:11 AM

एका महाविद्यालयाच्या मान्यतेसंदर्भातील प्रकरणात आदेशाची अवमानना झाल्यामुळे राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांनी ...

उच्च शिक्षण प्रधान सचिव : आदेशाचे केले नव्हते पालननागपूर : एका महाविद्यालयाच्या मान्यतेसंदर्भातील प्रकरणात आदेशाची अवमानना झाल्यामुळे राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची क्षमा मागितली. न्यायालयाने गेल्या तारखेस चहांदे यांना समन्स बजावून आदेशाची अवमानना झाल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. तसेच, १५ डिसेंबर रोजी यावर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार चहांदे न्यायालयात व्यक्तिश: हजर झाले. त्यांनी न्यायालयाची क्षमा मागून बी.ए., बी.कॉम. व बी.एससी. पदवीसाठी संबंधित महाविद्यालयाला मान्यता देण्यात आल्याचे व यासंदर्भात ११ डिसेंबर रोजी जीआर जारी करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने चहांदे यांची क्षमा स्वीकारून याविषयीची अवमानना याचिका निकाली काढली. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरणयवतमाळ जिल्ह्यातील सखिना शिक्षण संस्थेने गंभीरपूर येथे महिला शिक्षण महाविद्यालय सुरू करण्यासाठी अमरावती विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. विद्यापीठाने प्रस्ताव शासनाकडे पाठविला. शासनाने त्रुटी असल्याचे नमूद करून प्रस्ताव नामंजूर केला. परंतु, कोणकोणत्या त्रुटी आहेत हे संस्थेला सांगितले नाही. परिणामी संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. शासनाला न्यायालयातही समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. यामुळे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी न्यायालयाने संस्थेच्या महाविद्यालयाला कायम विनाअनुदानित तत्त्वावर २०१५-१६ शैक्षणिक सत्रापासून मान्यता देण्याचे आदेश शासनाला दिले होते. शासनाने या आदेशाचे पालन केले नाही. यामुळे संस्थेने अवमानना याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)