नागपूर : चित्रपट अभिनेते संजय दत्त यांनी शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी संग्रहालयाचे कौतुक करीत पुढच्या नागपूर भेटीत येथे एक दिवस निश्चित घालविण्याचे आश्वासनही दिले.
संजय दत्त हे शनिवारी पाालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात पोहोचले. काही वेळ त्यांनी पाहणी केली. वन्यप्राण्यांचे एनक्लोझरही पाहिले. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर., एफडीसीएमचे प्रबंध निदेशक वासुदेवन, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. प्रकल्पाचे सल्लागार अशफाक अहमद यांनी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून गोरेवाडा प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येथे जंगल सफारी सुरू झाली आहे. लवकरच आफ्रिकन सफारीही सुरू होणार आहे. सध्या येथे वाघ, बिबट, अस्वल आदी आहेत.