लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के. दिवसे यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय यादव रुजू होत आहेत. या आधी ते ठाणे येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने हे पद गेल्या काही दिवसापासून रिक्त होते.शांतनू गोयल यांची २२ मे रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती. २४ मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागासह १६ विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. अन् अचानक त्यांची बदली करण्यात आली.महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती वस्रोद्योग संचालकपदी (नागपूर) करण्यात आली आहे. आतापर्यंत या पदावर कार्यरत असलेले संजय मीना यांची बदली नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. माधवी खोडे-चवरे यापूर्वी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. त्या पुन्हा नागपुरात परतल्या आहेत.
संजय यादव नागपूर जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:07 AM
राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के. दिवसे यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय यादव रुजू होत आहेत.
ठळक मुद्देमाधवी खोडे परतल्या : दिवसे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी