शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विद्यापीठात बहरणार सप्तपर्णी

By admin | Published: July 05, 2017 2:13 AM

राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती मार्गावरील विद्यापीठाचे परीक्षा भवन, ‘एलआयटी’ परिसर, उद्यान येथे सुमारे १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने मेलींगटोनिया, सप्तपर्णी, सीलव्हर ओक आदी झाडांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, वन विभागाचे वनसंरक्षक गिरीपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, एनएसएस समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान विभागाचे अधीक्षक प्रवीण गोतमारे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.शाळांमध्ये लावले ‘कथेचे झाड’ग्रंथसहवासचे समन्वयक दिलीप म्हैसाळकर यांच्या संकल्पनेतून शहरातील शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘लावू झाड ...कथेचे’ असे या उपक्रमाचे नाव असून विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचनाची आवड गोष्ट सांगून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात हडस व सोमलवार शाळेपासून करण्यात आली. हडस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ए. पी. जोशी, पर्यवेक्षक दीप फडके, एनसीसी प्रमुख सुशील वंजारी तसेच, विदर्भ साहित्य संघाकडून ग्रंथसहवासचे दिलीप म्हैसाळकर, हडस शाळेच्या माजी विद्यार्थिनी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, अभिषेक वाघमारे व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी दिलीप म्हैसाळकर व डॉ. अंजली भांडारकर यांच्या हस्ते शाळेला ग्रंथभेट देण्यात आली. अभिषेक वंजारी यांनी आद्यकथाकार गुणाढ्य यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला तर मंजुषा जोशी यांनी गुणाढ्याची एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेची यंदाची दहावीची गुणवंत विद्यार्थिनी रश्मी जांभूळकर व एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सोमलवार रामदासपेठ शाळेत मुख्याध्यापिका वैशाली डाखोळे, ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ.अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अजय वैद्य आणि रेवती जोशी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे अव्वल तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कथाकथनासोबतच, शहरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार असून शाळेला ग्रंथभेटही दिली जाणार आहे.