शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सारो राजस्थान नागपूर में

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:27 AM

राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगला आहे. हा अनुभव घेतल्यावर नागपूरकरही म्हणताहेत सारो राजस्थान नागपूर में...

ठळक मुद्देराजस्थानी महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य, आभूषण, खाद्य संस्कृतीचे विशेष आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगला आहे. हा अनुभव घेतल्यावर नागपूरकरही म्हणताहेत सारो राजस्थान नागपूर में... 

श्री बीकानेरी माहेश्वरी पंचायत युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ डिसेंबर दरम्यान राजस्थानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी द.म.क्षे.सा. केंद्र आकर्षकरीत्या सजविण्यात आले आहे. मसकवादनाची गूंज अख्ख्या महोत्सवात पसरली आहे. प्रवेशद्वारावर राजस्थानी पेहराव केलेल्या मंडळींकडून मोठ्या अदबीने स्वागत होत आहे. राजस्थानच्या लोकांचे श्रद्धेय असलेले सालासर, खाटुमल, राणीसती, रामदेवबाबा यांच्या मंदिराची प्रतिकृती सोबतच महाराष्ट्रातील विठ्ठल रुक्मिणी व व्यंकटेश बालाजी मंदिराची प्रतिकृती येथे उभारली आहे. त्याचबरोबर राजस्थानचे हॅण्डीक्राफ्ट, टेराकोटाचे आकर्षक साहित्य, राजस्थानी बंदेज, राजस्थानी जुती, राजस्थानी डिजाईनमध्ये इंटेरिअर डेकोरेशन, मयुरसिंग राठोड यांची स्टोन व क्लॉथ पेंटींग, गिरीराज प्रसाद वैष्णव यांनी देवांसाठी तयार केलेले आकर्षक पोशख आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर महिलांकडून राजस्थानी ज्वेलरीची मागणी होत आहे. चौकर, चुडला, बोर, पैंजार, गोखरू राजस्थानमध्ये प्रचलित या ज्वेलरीला महिलांकडून पसंती मिळत आहे. उंटाची सवारी लहानग्यांसाठी चांगलीच आनंददायी ठरते आहे. या सर्वात विशेष म्हणजे राजस्थानी खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अनुभवण्यासाठी नागपूरकरांच्या उड्या पडत आहे. दालवाटी चुरमा, प्याज कचौरी, रबडी, मालपोहा, कुल्लड दूध, गट्याची भाजी, सांगरी भाजी हे सर्व येथे आहे. कठपुतली नाट्यसोबत राजस्थानी घुमर व लोकसंगीत
राजस्थानी संस्कृतीत कठपुतली नाट्य नेहमीच खास राहिले आहे. महोत्सवात कठपुतली नृत्याचा आनंद लुटता येत आहे. अख्ख्या बॉलिवूडला वेड लावलेल्या घुमर नृत्याची प्रस्तुती येथे होत आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे १०५ कलावंतांकडून येथे कालबेलिया, मयुर, चरी, चकरी, तेराताल, चंग या लोकनृत्याचे आकर्षक सादरीकरण येथे करण्यात येत आहे. भपंग व मसक वादनाचा आनंद येथे लुटता येत आहे. 
 नागपूरकरांसाठी हा एक अनोखा महोत्सव आहे. संपूर्ण राजस्थानचे मिनी मॉडल येथे मांडले आहे. हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरतो आहे.प्रतीक बागडी, प्रकल्प संयोजक, राजस्थानी महोत्सव

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रnagpurनागपूर