गुमगाव : सरपंच हाच गाव विकासाचा कणा आहे,असे मत जिल्हा सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षा सरपंच नलिनी शेरकुरे यांनी वागदरा (नवीन गुमगाव) येथील ग्रामपंचायत सभागृहात सरपंच समन्वय बैठकीत व्यक्त केले.
गाव विकासाचा पाया मजबूत करावयाचा असेल तर सरपंचांनी एकत्र येऊन आचारविचारांची देवाणघेवाण करावी. ग्रामस्थांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी किंबहुना ग्रामस्थांशी आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांशीसुद्धा सुसंवाद साधून विश्वासार्हता निर्माण करावी, असे आवाहन शेरकुरे यांनी केले.
यावेळी हिंगणा तालुका सेवा संघाचे अध्यक्ष सरपंच शुभम उडान, सरपंच प्रिया चरपे, सरपंच कविता सोमकुवर, सरपंच दिनेश ढेंगरे, सुहासिनी कोल्हे, लक्ष्मी हुलके, सुशीला दुर्गे, रंजना भगत, आशा आष्टनकर, विजया देवतळे, गजानन खंडारे आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक वागदराचे सरपंच प्रेमनाथ पाटील यांनी केले. संचालन निरंजन चामाटे यांनी तर आभार उपसरपंच किशोर पडवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास घोडे, सलीम मालाधारी, वीरेंद्र बागडे, मनीषा घोडे, रेखा साबरे आदींनी परिश्रम घेतले.