शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नागपूर जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 8:35 PM

जिल्ह्याच्या ठिकाणीच कॅन्सर रुग्णांचे निदान होण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) मदतीने जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र सुरू करणे, ‘एनसीआय’मध्ये आवश्यक उपकरण उपलब्ध करून देऊन पायाभूत सोयींचे श्रेणीवर्धन करणे आणि मनुष्यबळाला कॅन्सरविषयी प्रशिक्षण देण्याला घेऊन टाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

ठळक मुद्देटाटा ट्रस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसोबत करारविदर्भातील रुग्णांना मिळणार अद्यावत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ठिकाणीच कॅन्सर रुग्णांचे निदान होण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) मदतीने जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र सुरू करणे, ‘एनसीआय’मध्ये आवश्यक उपकरण उपलब्ध करून देऊन पायाभूत सोयींचे श्रेणीवर्धन करणे आणि मनुष्यबळाला कॅन्सरविषयी प्रशिक्षण देण्याला घेऊन टाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर व टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरामनन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्टचे मुख्य वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, ‘एनसीआय’चे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शैक्षणिक) कैलाश शर्मा, एनसीआयचे उपाध्यक्ष व माजी खासदार अजय संचेती, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, टाटा ट्रस्टचे मुख्य लक्ष्मण सेतुरामन, डॉ. आनंद बंग व एनसीआयचे आनंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.हा करार मैलाचा दगड ठरेल -मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे कॅन्सरचे दुसरे ‘कॅपिटल’ होत आहे. उत्तर प्रदेशनंतर  महाराष्ट्रात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून रुग्ण येतात. यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी वाढत आहे. कॅन्सर रुग्णांची ही गर्दी कमी करण्यासाठी व रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयात गरीब रुग्णांना व बालकांना सामाजिक संघटनांच्या मदतीने मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ‘एनसीआय’ आणि ‘टाटा ट्रस्ट’ यांच्या रुग्णसेवेला घेऊन झालेला हा करार एक मैलाचा दगड ठरणार आहे. याचा फायदा विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातील कॅन्सर रुग्णांनाही होणार आहे.देशात १९ कॅन्सर सेंटर -वेंकटरामननटाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरामनन म्हणाले, ‘एनसीआय’शी झालेला हा करार म्हणजे, विदर्भातील रुग्णांसाठी उच्च दर्जाच्या कॅन्सर शुश्रृषाव्यवस्थेविषयी असलेल्या आमच्या समर्पित भावनेचे द्योतक आहे. राज्यांच्या शासनाशी सहकार्य करून टाटा ट्रस्ट एक परिणामकारक कॅन्सर शुश्रृषा यंत्रणा घडविण्याचे काम करीत आहे. नुकतेच टाटा ट्रस्टने आसाम सरकारशी भागीदारी करून आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या मदतीने १९ अद्ययावत कॅन्सर सेंटर कार्यान्वित केले आहे. अशाच प्रकारच्या भागीदारीविषयी आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणासोबत चर्चा सुरू आहे.‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर म्हणाले, डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था यांच्या कार्यकारी समितीने कॅन्सरच्या निदानासाठी, सुरक्षेसाठी आणि उपचारांसाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. या इन्स्टिट्यूटमधून रुग्णांना सर्वाेत्तम शुश्रुषा, गुणवत्ता पद्धतीचे उपचार आणि उत्तम सोईसुविधा देण्याचे आमचे ध्येय आहे. ‘टाटा ट्रस्ट’शी झालेला करार आमच्या कॅन्सरशी सुरू असलेल्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सर्वांगीण शुश्रुषा देण्यात मदत करेल, असा विश्वास आहे.२४ हजार कॅन्सर रुग्णांवर उपचारडॉ. आनंद पाठक म्हणाले, ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने वर्षभरात २४५०० कॅन्सर रुग्णांवर उपचार केले असून यात ५ हजार नव्या कॅन्सर रुग्णांची संख्या आहे. यातील ८ हजार रुग्णांना भरती करून उपचार केले. ८०० रुग्णांवर शस्त्रक्रिया तर ७०० रुग्णांना रेडिएशन दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘चिल्ड्रन कॅन्सर युनिट’मधून १०० पेक्षा जास्त मुलांवर उपचार करण्यात आले. ‘एनसीआय’मध्ये शासनाच्या संपूर्ण योजना राबविल्या जात असल्याने गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे.टाटा ट्रस्टकडून १०० कोटींची मदतटाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार टाटा ट्रस्ट हे ‘एनसीआय’मध्ये उपकरणांसह, इमारतीच्या श्रेणीवर्धनसाठी १०० कोटींची मदत करणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी दिली.

टॅग्स :cancerकर्करोगTataटाटा