लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी सनदी अधिकारी वसंत खोब्रागडे यांनी त्यांची जडणघडण व प्रशासकीय प्रवासात शासकीय कर्तव्यासोबत लोकसहभागातून राबविलेल्या लोकाभिमुख व कल्याणकारी उपक्रमांचा लेखाजोखा सत्ता-संवेदना या पुस्तकातून मांडला आहे. प्रशासकीय सेवेत असतांना संवेदनशील राहून कसे काम करता येते, याची शिकवण देणारे हे पुस्तक खऱ्या अर्थाने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी एक हॅण्डबुक ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केला.माजी सनदी अधिकारी वसंत खोब्रागडे यांच्या सत्ता संवेदना या पुस्तकाचे प्रकाशन बजाजनगर येथील करुणा भवन येथे पार पडले. त्यावेळी विकास सिरपूरकर हे प्रमुख अतिथी होते. आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे मुख्य वक्ते होते.यावेळी प्रा. अशोक गोडघाटे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वसंतराव खोब्रागडे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी लोकांचे प्रश्न, समजून त्यांना लोकसहभागाच्या माध्यमातून सकारात्मक दिलासा दिला. त्यांचा लोकसंपर्क अतिशय दांडगा होता. अधिकारी वर्गासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांशीही त्यांचे नाते होते. यावेळी वसंत खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अतिरिक्त जिल्हाधिकारी (मुंबई) सुधीर मेश्राम यांनी संचालन व प्रस्ताविक केले. सेवानिवृत्त माहिती संचालक भी.म. कौसल यांनी आभार मानले.
सत्ता संवेदना हे महसूल विभागासाठी हॅण्डबुक ठरेल : विकास सिरपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:29 PM
प्रशासकीय सेवेत असतांना संवेदनशील राहून कसे काम करता येते, याची शिकवण देणारे हे पुस्तक सत्ता-संवेदना खऱ्या अर्थाने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी एक हॅण्डबुक ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देवसंत खोब्रागडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन