लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समता सैनिक दल आणि नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान जागर रॅली काढण्यात आली. यादरम्यान संविधान बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला.अ. भा. प्रबुद्ध नाट्य परिषद व कर्मचारी संघटनेच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय एकपत्री प्रबुद्ध नाट्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी संविधान जागर रॅलीने करण्यात आली. संविधान बचाव-देश बचाव असा संदेश देणाऱ्या या रॅलीचे नेतृत्व भंते प्रियदर्शी व भंते धम्मोदय यांनी केले.रॅलीमध्ये कर्मचारी नेते अरुण गाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नाटककार संजय सायरे, कवि भोला सरवर, उत्तमराव खोब्रागडे, माजी शिक्षणाधिकरी निर्गुंशा ठमके, नरेश वाहाणे, सुखदेव नारनवरे, अमृत गजभिये, राजेश खरे, अॅड. सोनिया गजभिये, धर्मेश दुपारे, शितल दोडके, कमलेश मेश्राम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.आज प्रबुद्ध नाट्य संमेलनशनिवारी कुकडे ले-आऊट चंद्रमणीनगर येथील पवार सभागृहात दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. अरुण गाडे हे उद्घाटक आहेत तर डॉ. वृषाली रणधीर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. दिवसभर विविध सत्र होतील. पुरस्कार वितरणाने या संमेलनाची सांगता होईल.