दत्ता मेघे पॉलिटेक्निक वाचवा : कर्मचारी हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:38 PM2019-07-04T22:38:18+5:302019-07-04T22:39:28+5:30

दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, महाविद्यालय व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Save Datta Meghe Polytechnic: Employee in High Court | दत्ता मेघे पॉलिटेक्निक वाचवा : कर्मचारी हायकोर्टात

दत्ता मेघे पॉलिटेक्निक वाचवा : कर्मचारी हायकोर्टात

googlenewsNext
ठळक मुद्दे ८ जुलै रोजी पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, महाविद्यालय व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हे महाविद्यालय बंद केल्यास विद्यार्थी, कर्मचारी भागीदारांचे मोठे नुकसान होईल. प्रशासनाला पॉलिटेक्निक महाविद्यालयाची इमारत फिजिओथेरपी व आयुर्वेद महाविद्यालयासाठी वापरायची आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याचा कट रचला गेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव खारीज केला आहे. या महाविद्यालयाला अनेक वर्षे नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडेशनची मान्यता होती. असे असताना हे महाविद्यालय बंद करणे कुणाच्याच भल्याचे होणार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आवश्यक विद्यार्थी मिळत नसल्यामुळे नागपूरसह संपूर्ण राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉलिटेक्निकच्या २० हजार जागा उपलब्ध आहेत, पण प्रवेश अर्ज केवळ सहा हजार आले आहेत.

Web Title: Save Datta Meghe Polytechnic: Employee in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.